प्राचार्या डॉ. इंदिरा सुतार राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित - चंदगड लाईव्ह न्युज

20 April 2023

प्राचार्या डॉ. इंदिरा सुतार राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

नवी दिली येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना प्राचार्या डॉ इंदिरा सुतार.


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        नेहरूनगर, बेळगाव येथील शेख महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. इंदिरा सुतार यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल 'एशिया पॅसिफिक एज्युकेशन एक्सलेन्स' पुरस्काराने नुकतेच नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले.

        मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेयर्स इंडिया संस्थेचे सचिव नरेंद्र सिंग व सुप्रीम कोर्टचे वरिष्ठ ॲड. डॉ. जी. व्ही. राव यांच्या हस्ते मानचिन्ह व प्रमाणपत्र डॉ सुतार यांना प्रदान करण्यात आले. यावेळी संस्था सदस्य सुमन सिंग, मिनिस्ट्री ऑफ लेबर एम्प्लॉयमेंट चे प्रोफेसर डॉ. बिपिन बात्रा, गौरव गुप्ता, मेघा वर्मा, डॉ. एन. एस. बाबू आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. इंदिरा सुतार या शेख शिक्षण संस्थेत उत्कृष्ट कार्यासाठी परिचित असून त्यांनी राणी चन्नम्मा विद्यापीठात सिंडिकेट सदस्य व अकॅडमिक कौन्सिल सदस्य म्हणूनही आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. पुरस्काराबद्दल शेख शिक्षण संस्था समूहाचे चेअरमन व ट्रस्टी डॉ. सबीना तसेच पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

No comments:

Post a Comment