मजरे कारवे येथे मंगळवार 9 मे रोजी प्रबोधन शिबिराचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

07 May 2023

मजरे कारवे येथे मंगळवार 9 मे रोजी प्रबोधन शिबिराचे आयोजन

 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

चंदगड तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्या वतीने मंगळवार दिनांक 9 मे रोजी मजरे कार्वे येथील महात्मा फुले विद्यालयाच्या पटांगणात प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

        या प्रबोधन शिबिराच्या पहिल्या सत्राला सकाळी 9 वाजता सुरूवात होणार असून चौकशी समिती व न्याय पद्धती यावर जिल्हा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष बी. एल. नाईक यांचे व्याख्यान,  काळाची आव्हाने व शिक्षक संघटना यावर कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बी. एस. खामकर, देय रजा व रजेचा प्रकार यावरती कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव सुरेश खोत यांची व्याख्याने व तुमचे प्रश्न आमची उत्तरे (शंका समाधानी) शिक्षक संघटना फेडरेशनचे राज्य समन्वयक बी. डी. पाटील हे उत्तरे देणार आहेत. त्यानंतर दुपारी 11:30 ते 2 या वेळेत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे ॲड. एम. एस. टोपकर, शिक्षक महासंघाचे शिक्षक संघाचे शिक्षक संघाचे राज्य समन्वयक बी. डी. पाटील, शाळा न्यायाधिकरण व लेबर कोर्टचे ॲड. डी. एन. पाटील कामगार न्यायालयाचे ॲड. डी. डी. मन्नोळकर, सेवानिवृत्त प्राचार्य ए. एस. पाटील, माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र शामराव देसाई, धनंजय विद्यालयाच्या अध्यापिका दीपा दत्तू पाटील, गणेश दामोदर नीळ, धनाजी पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. 

       या सत्कार सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून महात्मा फुले जूनिअर कॉलेजचे प्राचार्य एम. एम. गावडे हे उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषद पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत आसगावकर ,महाराष्ट्र राज्य शिक्षक महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूरचे उपाध्यक्ष सरदार नाळे व एम. एम. तुपारे हे उपस्थित राहणार आहेत. दुपारी दोन वाजेपर्यंत चालणाऱ्या या प्रबोधन शिबिराला तालुक्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष सुभाष बेळगावकर यांनी केले आहे.No comments:

Post a Comment