हरवलेला संवाद पुन्हा घडविण्यासाठी स्नेहमेळाव्यांची गरज - प्रा.‌ परसू गावडे - चंदगड लाईव्ह न्युज

07 May 2023

हरवलेला संवाद पुन्हा घडविण्यासाठी स्नेहमेळाव्यांची गरज - प्रा.‌ परसू गावडे

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

मोबाईलच्या युगात हरवलेला संवाद पुन्हा निर्माण होण्यासाठी अशा स्नेहमेळाव्यांची गरज असल्याचे मत बेळगाव येथील आरपीडी काॅलेजचे मराठी विभाग प्रमुख प्रा. परसू गावडे यांनी व्यक्त केले.‌ मजरे कारवे (ता. चंदगड) येथील महात्मा फुले विद्यालय व गु. म. भ. तुपारे ज्युनियर कॉलेजमध्ये आयोजित २००० सालच्या १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या आयोजित स्नेहमेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.‌ अध्यक्षस्थानी प्राचार्य एम. एम. गावडे होते. 

प्रारंभी एन. जी. टक्केकर, पी. ए. बोकडे, पांडुरंग साळुंखे यांना आदरांजली वाहिली. यावेळी बोलताना एम. एस. कोले म्हणाले की, तुमच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून कडकपणा घेतल्याचे त्यांनी सांगितले. जी. पी. वरपे म्हणाले की, शैक्षणिक जीवनात विद्यार्थ्यांना केंद्रंबिंदू म्हणूनच काम केले त्यामुळेच विविध पदांवर आपले विद्यार्थी काम करत असल्याचे समाधान वाटते. एस. जे. मोहनगेकर यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. प्राचार्य गावडे यांनी विद्या संकुलाचा आढावा घेऊन गुरूपेक्षा विद्यार्थी चांगल्या पदावर कार्यरत असल्याने समाधान व्यक्त केले. तत्पूर्वी राजेश्री पाटील हिने प्रास्ताविक केले. स्वागत प्रशांत पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी जोतिबा गुरव, तानाजी कागणकर, शिवाजी पाटील, वैजनाथ मन्नोळकर, विकास टक्केकर, पुंडलिक डसके, एम. के. पाटील, राम कागणकर, उमेश पाटील, सुजाता पाटील, सुरेखा गिरीबुवा यांनी परिश्रम घेतले. सुलोचना पाटील यांनी सूत्रसंचलन केले तर निंगाप्पा बोकडे यांनी आभार मानले.
No comments:

Post a Comment