निट्ट्रर नरसिंह मंदिर जीर्णोद्धार - कर्यात भागात एक अपूर्व सोहळा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

06 May 2023

निट्ट्रर नरसिंह मंदिर जीर्णोद्धार - कर्यात भागात एक अपूर्व सोहळा संपन्न

श्री नरसिंह मंदिर

निट्टूर / अनंत पाटील - सी. एल. वृत्तसेवा
        निट्टूर (ता. चंदगड) येथे पांडवकालीन असलेल्या  श्री नरसिहं मंदिर कळसारोहण व नरसिंह जयंती सोहळा दि. 2 मे ते 4 मे अखेर नुकताच पार पडला. हा कर्यात भागातील एक अपूर्व सोहळा होता. गेले महिना भर  चाललेल्या  नियोजनाचा  हा परिपाकच म्हणावा लागेल.
         या कार्यक्रमासाठी गावातील नोकरी व्यवसायनिमित्त बाहेर असणारी मंडळी उपस्थित होती. सर्वांचा उत्साह पाहण्यासारखा होता. पहिल्या दिवशी   कळस मिरवणूकीमध्ये निट्टूर, म्हाळेवाडी,
घुलेवाडी, जक्कन्हटीच्या महिलांचा सहभाग होता. त्यामध्ये घुलेवाडी  लेझीम पथक,      इस्कान बेलगाव चा"  हरे कृष्ण हरे रामा चा गजर अशा भक्तिमय वातावरणात ही मिरवणूक झाली. नंतर प्रसाद वाटप झाले. त्यादिवशी सुमारे सहा हजार भाविक भक्तांनी या मिरवणूकीत सहभाग घेऊन  प्रसादाचा लाभ घेतला. त्या रात्री झालेले प्रा. शिवाजीराव भुकेलेंचे  "ज्ञानदेवाचे पसायदान" यावरील व्याख्यान सर्वाचे कान उघडणी करणारे, प्रबोधणात्मक असे होते. या व्याख्यानाला उपस्थिती मात्र कमी जाणवली.
  दि.   3 रोजी  होमहवन, कळसारोहण हा कार्यक्रम मोठया भक्तिमय वातावरणात पार पडला. हे दोन दिवस निट्टूर, घुलेवाडी, म्हाळेवाडी या गावच्या महिला हरिपाठ ही एकापेक्षा एक सादर झाले. दोन्ही रात्री आजबाजुच्या 14  गावचे  भजन जागर ही पार पडले. या नंत्तर आला तो महत्वाचा तिसरा दिवस महाप्रसादाचा दिवस
     ★ अप्रतिम महाप्रसाद नियोजन★ 
----–----------------------------------------अगोदर रात्र भर जागून लोकांनी महाप्रसाद तयार केला होता. म्हाळेवाडी गावच्या लोकांनी भात करण्याची जबाबदारी घेऊन ती शेवटपर्यंत नेटाने पार पडली. खीर आम्हीच करणार म्हणून  महिनाभर अगोदरच निरोप देणाऱ्या कोवाड कराचे ही विशेष कौतुक करावे लागेल. 25 - 30 कोवाडकर रात्र भर जागून अप्रतिम अशी खीर बनवली होती. बाकीचे सर्व पदार्थ संयोजक असलेल्या निट्टूर स्वयंपाकि मंडळीनी बनवली होती. या सर्व स्वयंपाकी मंडळींनी जीव ओतून, अंत्यत भक्तिभावाने केल्यामुळे हा महाप्रसाद एकदम रुचकर झाला होता.
          ★नियोजन बद्ध वाटप★
---------------------------------------
प्रसाद वाटपचे नियोजन चांगले झाले की, अजूनही आजूबाजूच्या गावात या प्रसाद वाटपा ची चर्चा चालू आहे. 25 हजार लोकांना प्रसाद वाटप झाले. कुणालाही कसलाही त्रास न होता हे वाटप पार पडले. जेवण मंडपात पुरुष व महिला विभाग स्वतंत्र होते. प्रत्येक पंक्तीची जबाबदारी प्रत्येक वार्डातील तरुणांनी तितक्याच समर्थपणे पार पाडली. एकानेहीं चालढकल केल्याचे दिसून येत नव्हते. खीर वाटपाची रचनाच सर्वांचा उत्साह वाढवणारी होती.
  मी मागील लेखात म्हटले होते की "कर्यातील एकी दाखवण्याची संधी" अगदी तशीच एकी समस्त निट्टूरकरानी दाखवली. सर्वांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. अशा प्रकारे चांगल्या कामात एकी महत्वाची असते.
        ★उपमुख्यमंत्र्याचा अचानक दौरा-
"जोर का झटका धीरे से लगा"★★★
----------------------------------------------
      शेवटच्या दिवशी नरसिंह जयंती शेवटची आरती झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  येणार आहेत असा निरोप आला. खरंतर या संदेशावर विश्वासच बसत नव्हता. पण त्यांचे नरसिंह कुलदैवत असल्यामुळे ते बेळगाव भागात प्रचार नियोजनात होते. भरमूअण्णा पाटील व शिवाजीराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे ते निट्टूर नरसिंह मंदिरला आ याले. सम्पूर्ण माहोलच पार बदलून गेला. त्यांच्या बरोबर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन ही होते. "ते आले आणि जिंकून गेले"असे वातावरण  झाले. 75 लाख देणगी तुन हे काम तुम्ही केलाय बाकीचे काम आम्ही करू""हे त्यांचे वाक्य अधोरेखित करणारे आहे. दोन्ही मंत्र्यांनी नरसिंह मंदिर व निट्टूर गावासाठी भरघोस निधी देण्याचे दिलेले आश्वासन निट्टूरकरांच्या आशा उंचावणारे आहे. कुलदैवत नरसिंह देवच या सर्व  विकास गोष्टीवर मार्ग काढणार  असे वाटते. "मी पुन्हा येणार"असे म्हटलो की येतोच ते कोणत्याही मार्गाने ..ते तुम्हांला माहीत आहेच. असे सांगून पुन्हा नरसिंह मंदिरला भेट देण्याचे त्यानी आश्वासन दिले. खरंच ते सत्तेत आहे, तोवर परत एकदा असंच मंदिराच्या बाबत असो वा गावच्या विकासबाबत अनेक योजना, प्रचंड निधी घेऊन यावेत अशीच नरसिंह चरणी प्रार्थना करूया.
     या प्रसंगी गोविंद पाटील (गुरुजी) नी प्रास्तविकात उडवलेले चौकार- षटकार मात्र सर्वाच्यांच लक्षात राहतील. गावची, मंदिराची विकासाच दृ्टीने त्यांनी अगदी सुंदर रीतीने मांडणी केली आणि सर्वांच्या टाळ्या मिळवल्या.
    असा संपूर्ण सोहळ्याचा शेवट सर्वांचाच उत्साह वाढवणारा ठरला.
   या संपूर्ण कार्यक्रमात ग्रामपंचायत,जीर्णोद्धार कमिटी ,ट्रॅक्टर संघटना,सप्ताह कमिटी,सर्व तरुण मंडळे, ,सर्व वारकरी मंडळी,सर्व हरिपाठ मंडळ,सर्व सहकारी संस्था,सर्व तरुण मंडळे,आधार संघटनेचे "तरुण कार्यकर्ते", सर्व महिला बचत गट, माजी सैनिक संघटना ,व गावातील जेष्ठ मंडळी या सर्वांनीच योगदान दिल्यामुळे हा कर्यातीतील एक मोठा कार्यक्रम यशस्वी पार पडला.

No comments:

Post a Comment