श्री शिवशक्ती हायस्कूल अडकूर येथे लोकराजा राजर्षी शाहू महाराज पुण्यतिथी साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

06 May 2023

श्री शिवशक्ती हायस्कूल अडकूर येथे लोकराजा राजर्षी शाहू महाराज पुण्यतिथी साजरी

अडकूर येथे राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्यतिथी निमित्य उपस्थित मान्यवर

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

  श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड )येथे लोकराजा राजर्षी शाहू महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी १०० सेकंद स्तब्धता राखून आदराजंली वाहण्यात आली.

लोकराजा राजर्षी शाहू महराज यांची १०१ वी पुण्यतीथी साजरी करण्यात आली. यावेळी लोकराजा शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक व्ही. एन. सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत अध्यापक एस. के. पाटील यांनी केले. यावेळी पी. के. पाटील यांनी राजर्षी शाहू जिवनावर विचार प्रकट केले. या कायक्रमा नंतर विद्यार्थ्यांना वार्षिक निकालाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला एस. डी. पाटील, बी. जी. हिशेबकर, एस. एन. पाडले, एस. एन. पाटील, आय. वाय. गावडे, आर. डी. पाटील, जे. व्ही. कांबळे आदि मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक बी. पी. गावडे याांनी केल.  सूत्रसंचालन प्र. रामदास बीर्जे याांनी तर आभार प्रा. एम. पी. पाटील याांनी मानले.

No comments:

Post a Comment