सरोळी येथे बुधवारी श्री ब्रम्हदेव मंदिर वास्तू शांती समारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

06 May 2023

सरोळी येथे बुधवारी श्री ब्रम्हदेव मंदिर वास्तू शांती समारंभ

सरोळीचे श्री ब्रमदेव मंदिर

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
     सरोळी (ता. गडहिंग्लज ) येथील ग्राम दैवत श्री ब्रम्हदेव मंदिराची वास्तू शांती, जिर्णोध्दार, कलशारोहन व मूर्ती प्रतिष्ठापणा असा संयुक्त कार्यक्रम बुधवार दि १० मे पासून १२ मे पर्यंत संपन्न होत आहे.
     दि. १० मे रोजी सर्व देवताना  अभिषेक व निमंत्रण व सायंकाळी ४ वाजता हरिपाठाचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवार दि. ११ रोजी सकाळी काकड आरती, वास्तू शांती व होमहवन, मूर्ती सहवाद्य मिरवणूक, हरिपाठ, दिंडी स्वागत व शिप्पूरच्या विठ्ठल रखूमाई  मंडळाचा सोंगी भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. रात्री सरोळी भजनी मंडळाचा हरिजागर असणार आहे. शुक्रवार दि. १२ रोजी मूर्ती प्रतिष्टापणा व कलशा रोहन व मंदिर उद्घाटन होणार आहे. यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन सरोळी ग्रामस्थांनी केले आहे.

No comments:

Post a Comment