उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले निटूर येथील नरसिंग देवाचे दर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

04 May 2023

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले निटूर येथील नरसिंग देवाचे दर्शन

निट्टूर  श्री नरसिंह देवालयाच्या विकासासाठी सर्वोतोपरी निधी देणार - उपमुख्यमंत्री देवेद्र फडणविस

निट्ट्रर येथे बोलताना उपमुख्य मंत्री देवेद्र फडणवीस ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन


तेऊरवाडी / संजय पाटील (सी. एल. वृत्तसेवा)

चंदगड तालूक्यात निट्टूर येथे असणारे श्री नरसिंह मंदिर सर्वांबरोबर माझेही श्रद्धास्थान आहे. अति प्राचीन पांडवकालीन असणाऱ्या या मंदिरासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही महाराष्ट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी दिली.
   आज निटूर (ता. चंदगड) येथील श्री नरसिंह देवालयाच्या जिर्णोद्धार समारंभाच्या सांगता कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस बोलत होते. यावेळी ग्राम विकास मंत्री  गिरीश महाजन, माजी रोहयो मंत्री भरमू अण्णा पाटील, माथाडी कामगार रांघटनेचे शिवाजीराव पाटील, सुरगेश्वर मढ नूलचे मठाधीपती गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी आदि मान्यवर उपस्थित होते.
 यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस म्हणाले, माझे कुलदैवत श्री नरसिंह आहे. आज योगायोग मला निट्टूर येथील श्री नरसिंहाचे दर्शन घेण्याची संधी 
नरसिह जयंती दिवशी मिळाली आणि ही संधी शिवाजीराव पाटील यांनी उपलब्ध करून दिली. अतिशय सुंदर असा हा परिसर आहे. या परिसराचा विकास आराखडा बनवून येथील धार्मिक स्थळाचा कायापालट करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .
 मी पून्हा येणार
देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले, येथील रमणीय परिस बघून माझे मन भरले आहे. त्यामुळे मी येथे पून्हा येणार. तुम्हाला माहिती आहे की मी पुन्हा येतो बोललो की मग कसेही केव्हाही पून्हा येतो. असे म्हणताच उपस्थितानी टाळ्या व शिट्या वाजवून दाद दिली.

ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले, या भागाचा विकास आरखडा बनवून तो 
पुर्ण करू. या मंदिर परिसराबरोबरच गावच्या सर्वांगीन विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे त्यांनी आश्वासन दिले.  

शिवाजीराव पाटील बोलताना म्हणाले,
साहेबांनी चंदगडच्या विकासासाठी लक्ष घातले आहे. माझ्या आग्रहास्तव उपमुख्यमंत्री या ठिकाणी आले आणि नरसिह देवाचे दर्शन घेतले यामध्ये धन्यता आहे.
प्रथम देवेंद्र फडणविस यांचा सत्कार सरपंच गुलाब पाटील यांनी केला. तर गिरीश महाजन यांचा सत्कार युवराज पाटील यांनी केला. यावेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक गोविद पाटील यांनी केले. 'सुत्रसंचालन युवराज पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment