नांदवडे येथे गोवा बनावटीची दारू जप्त, दिड लाखांचा मुद्देमाल हस्तगत, गडहिंग्लज उत्पादन शुल्कची कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

03 May 2023

नांदवडे येथे गोवा बनावटीची दारू जप्त, दिड लाखांचा मुद्देमाल हस्तगत, गडहिंग्लज उत्पादन शुल्कची कारवाई


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
     राज्य उत्पादन शुल्कच्या गडहिंग्लज विभागाने छापा टाकून नांदवडे (ता. चंदगड) येथे गोवा बनावटी मद्याचे एकूण २७ बॉक्स जप्त केले असून यामध्ये एकूण रु. १,५५,०४०/- रु.किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
   कर्नाटक राज्य विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मद्य वाहतुकीवर निर्बंधासाठी विविध ठिकाणी तपासणी नाके लावण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने चंदगड तालुक्यात गस्त घालत असताना नांदवडे गावात गोवा बनावटीच्या मद्याचा साठा असल्याची बातमी मिळाली त्यानुसार नांदवडे  गावच्या हद्दीत कुभेंटेक नावाच्या शेतामध्ये गोवा बनावटी मद्याचे वेगवेगळया उच्च ब्रॅण्डचे २७ बॉक्स मिळून आले. यामध्ये परशराम गोपाळ मळवीकर या युवकास ताब्यात घेण्यात आले.सदर कारवाई आयुक्त विजय सुर्यवंशी, महाराष्ट्र राज्य मुंबई,बी. एच.तडवी, विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभाग, रविंद्र आवळे, अधीक्षक कोल्हापूर, उपअधीक्षक आर. एल. खोत यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक एम.एस. गरुड, उप निरीक्षक एल. एन. पाटील, सहा. दुय्यम निरीक्षक एस. आर. ठोंबरे, यासह काॅ. बी. ए. सावंत, जी. एस. जाधव, एस. बी. चौगुले, ए.टी.थोरात, मुकेश माळगे यांनी केली.अधिक तपास उपनिरीक्षक किरण पाटील हे करत आहेत.

No comments:

Post a Comment