चंदगड तालुका महा ई सेवा क्रिकेट चषक २०२३ चा श्रमीक संघटना विरुध्द माध्यमिक शिक्षक संघ यांच्यातील अंतिम सामना शुक्रवारी - चंदगड लाईव्ह न्युज

03 May 2023

चंदगड तालुका महा ई सेवा क्रिकेट चषक २०२३ चा श्रमीक संघटना विरुध्द माध्यमिक शिक्षक संघ यांच्यातील अंतिम सामना शुक्रवारीचंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड तालुका महा ई सेवा यांच्या वतीने ०१ एप्रिल २०२३ पासुन  चंदगड तालुका महा ई सेवा क्रिकेट चषक - २०२३ सुरु आहे. याचा अंतिम सामना शुक्रवार दिनांक ०५ मे २०२३ रोजी इन्डॉल स्टेडीयम चंदगड येथे खेळविले जाणार असल्याची माहीती संयोजकांनी दिली. 

        चंदगड तालुका महा ई सेवा क्रिकेट चषक - २०२३ चा अंतिम सामना श्रमीक संघटना संघ विरुध्द माध्यमिक शिक्षक संघ यांचेत होणार आहे. तसेच तृत्तीय क्रमांकासाठीचा क्रिकेट सामना महावितरण विरुध्द सहकारी पतसंस्था बँक यांचेत होणार आहे.  त्यानंतर  विजेत्या संघाना बक्षिस वितरण व या स्पर्धत सहभाग घेतलेल्या सर्व २४ संघाना  प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन गौरव  करण्यात येणार आहे. हौसी प्रेक्षक वर्गानी या  क्रिकेट सामन्याचा पाहणेस आवर्जुन उपस्थिीत रहावे व सामने पाहण्याचा आनंद लुटावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment