श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळाचा यंदाचा पद्मश्री पुरस्कार कुडाळच्या ग्रहसंकेतच्या संस्थापिका दीपाली गुरव जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

03 May 2023

श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळाचा यंदाचा पद्मश्री पुरस्कार कुडाळच्या ग्रहसंकेतच्या संस्थापिका दीपाली गुरव जाहीर

दीपाली गुरव


कुडाळ / सी. एल. वृत्तसेवा

       श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळातर्फे एकदिवसीय ज्योतिष संमेलन व वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (ता. ७) आयोजित केला आहे. यंदाचा पद्मश्री पुरस्कार कुडाळच्या ग्रहसंकेतच्या संस्थापिका दीपाली गुरव, चैतन्यभूषण पुरस्कार साताऱ्याच्या संजीवनी मंडळाचे संस्थापक डॉ. विकास खिलारे, आणि कार्यगौरव पुरस्कार वेदचक्षू ग्लोबचे संस्थापक उज्ज्वल पावले यांना जाहीर करण्यात आला. हा कार्यक्रम रविवारी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेसहा या वेळेत जे. के. फाईल्स येथील साईमंगल कार्यालयात होणार असल्याची माहीती मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रसन्न मुळ्ये यांनी ही माहिती दिली. 

     पुरस्कार वितरण सोहळ्याला पं. विजय जकातदार, ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार, अॅड. मालती शर्मा, विजयशास्त्री संगमुळे, प्रिया मालवणकर, राधेश पाटील उपस्थित राहणार आहेत. सकाळी अॅड. डॉ. मालती शर्मा यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर विजय जकातदार व्याख्यान देतील. पावणेबाराला स्वागत समिती सत्कार डॉ. प्रसन्न मुळ्ये यांच्या हस्ते होणार आहेत. दुपारी सव्वाबाराला प्रिया मालवणकर यांच्या अध्यक्षतेखाली मुखचर्याशास्त्र पदवीदान व पुस्तक विजयशास्त्री संगमुळे यांच्या हस्ते होईल. दोनला नंदकिशोर जकातदार यांच्या अध्यक्षतेखाली वक्तृत्व स्पर्धा, दुपारी साडेतीनला राधेश पाटील यांच्या हस्ते आजीव सदस्यांचा सत्कार, चारला कुंडली विशारद, कुंडली भूषण, कुंडली भास्कर पदवीदान कार्यक्रम होईल. साडेचारला पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. ज्योतिषप्रेमी व रत्नागिरीकरांनी या संमेलनात भाग घ्यावा, असे आवाहन श्री. चैतन्य ज्योतिष मंडळाच्या कार्याध्यक्ष विवा साठे, सचिव डॉ. चंद्रकांत वाघुळदे, उपाध्यक्ष मधुरा चिंचळकर यांनी केले.


सी. एल. न्युजच्या राशीभविष्य लेखिका दिपाली गुरव

        दिपाली गुुरव यांचे मुळ गाव चंदगड तालुक्यातील सातवणे हे आहे. त्यांनी चंदगड तालुका पत्रकार संघाचे लोकप्रिय पोर्टल चॅनल चंदगड लाईव्ह न्युज च्या माध्यमातून दैनदिन राशिभविष्य लिहिले होते. मध्यतरी काही कारणास्तव त्यांनी लिखान बंद केले होते. पुन्हा त्या वाचकांच्या सेवेत लवकरच हजर होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने चंदगड तालुक्यातूनही त्यांचे कौतुक होत आहे. 

No comments:

Post a Comment