![]() |
अडकुर आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना ग्रामस्थ. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत आयोजित `सुंदर माझा दवाखाना` मोहिमेअंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र अडकुर यांना द्वितीय क्रमांकचा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या उत्कृष्ट कार्याबद्दल ग्रामस्थांमार्फत अडकुर केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस सुरेश दळवी, ग्रामपंचायत सदस्य शिवराज देसाई, सामाजिक कार्यकर्ते उदय देसाई, रघुनाथ पाटील, संजय देसाई आदी उपस्थित होते. डॉ. सोमजाळ आणि सर्व कर्मचाऱ्यांचे समाजाच्या विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment