सावधान..! पावर ट्रेलर चोरांची टोळी झाले सक्रिय, दीड लाखांचा पॉवर ट्रेलर लंपास - चंदगड लाईव्ह न्युज

20 May 2023

सावधान..! पावर ट्रेलर चोरांची टोळी झाले सक्रिय, दीड लाखांचा पॉवर ट्रेलर लंपास

पावर ट्रेलरचे संग्रहित छायाचित्र
कालकुंद्री  : सी. एल. वृत्तसेवा

      ट्रॅक्टर, पावर ट्रेलर धारक शेतकऱ्यांनो सावधान...! गडहिंग्लज, आजरा, चंदगड भागात पावर ट्रेलर चोरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे आपली शेती यंत्रे व अवजारे सांभाळा. अशा प्रकारे सावधानतेचा इशारा देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. याचे कारण म्हणजे हडलगे ता. गडहिंग्लज येथून नुकताच एक पावर ट्रेलर चोरीला गेल्याची फिर्याद दाखल झाली आहे.
  याबाबतचे वृत्त असे, सुमारे दीड लाख रुपये किमतीचा पॉवर ट्रेलर चोरी झाल्याची फिर्याद हडलगे (ता. गडहिंग्लज) येथील शेतकरी व माजी सरपंच विष्णू रामा पाटील (वय ६७) यांनी नेसरी पोलिस ठाण्यात दिली आहे. डोणेवाडी गावातील गट नंबर १५१ मध्ये पाटील यांच्या मालकीची शेती आहे. या शेतात त्यांनी पॉवर ट्रेलर मशागतीकरिता नेला होता. पाटील हे सायंकाळी सहा वाजेपर्यंतपर्यंत मशागत करून शेजारी असणाऱ्या पुतण्या वसंत पाटील यांच्या उसाच्या शेतामध्ये पॉवर ट्रेलर लावून हडलगे गावी घरी गेले होते. तिसऱ्या दिवशी सकाळी हा पॉवर ट्रेलर शेतात दिसून आला नाही, पाटील यांनी अज्ञाताविरोधात चोरीची फिर्याद दिली आहे. चोरट्याकडून आता शेतातील पावर ट्रेलर ही लक्ष होत असल्याने शेजारील चंदगड तालुक्यातील ही काही पावर ट्रेलर घेतलेल्या शेतकऱ्यांना चिंता लागून आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे शेती यंत्र धारक शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
No comments:

Post a Comment