अडकूर येथील शिवशक्ती हायस्कूलमध्ये शनिवारी रंगणार माजी विद्यार्थी मेळावा - चंदगड लाईव्ह न्युज

19 May 2023

अडकूर येथील शिवशक्ती हायस्कूलमध्ये शनिवारी रंगणार माजी विद्यार्थी मेळावा
अडकूर / सी. एल. वृत्तसेवा
     श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड) येथील १९९५ - ९६ साली १० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनिंचा स्नेह मेळावा तब्बल २६ वर्षा नंतर शनिवार दि. २० मे रोजी रंगणार आहे.
प्रिय आमुची ही अशी शाळा, तिच्या वर आम्ही काय लिहावे, महती तीची गाता, शब्दही कमी पडावे अशा या १९९६ साली शाळेतून वेगवेगळ्या क्षेत्रात भरारी घेतलेले विद्यार्थी उद्या एकत्र जमून जुन्या आठवणीना उजाळा देणार आहेत. सकाळी ८.३० पासून ते दुपारी 3 पर्यंत हा स्नेहमेळावा रंगणार असून यामध्ये विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment