शासनाच्या विविध योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठीच शासन आपल्या दारी - प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे - चंदगड लाईव्ह न्युज

19 May 2023

शासनाच्या विविध योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठीच शासन आपल्या दारी - प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे

 


चंदगड/ सी. एल. वृत्तसेवा

 शासनाच्या विविध योजनांची माहिती समाजातील तळागाळापर्यंत पोहोचून, त्या योजनाचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा यासाठी शासन आपले आधारे हा उपक्रम राबवत असल्याचे मत प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी व्यक्त केले .चंदगड तालुक्यातील बागिलगे येथे आयोजित महसूल व वन विभागाच्या वतीने शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.

सुरुवातीला माजी प्राचार्य एस बी पाटील यांनी प्रास्ताविकातून शासनाच्या या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला तर गटविकास अधिकारी चंद्रकांत बोंडरे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि त्याचा लाभ याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. राज्य विक्रीकर अधिकारी गोपाळ पाटील यांनी शासनाच्या विविध योजना पासून समाजातील तळागाळातील घटक वंचित राहतो त्यासाठी शासनाने विविध उपक्रम राबवावेत व त्यांना संधी उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली .प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे आपल्या अध्यक्ष मनोगतात पुढे म्हणाले शासनाच्या अनेक योजनांमध्ये काही सिस्टीम प्रॉब्लेम निर्माण होतो. यामध्ये भाऊबंदकी वादामुळे कागदपत्रे सादर करत असताना येणाऱ्या अडचणीमुळे त्याचा लाभ मिळत नाही .त्यामुळे असे वाद सामोपचाराणी मिटले तर एकोपा नांदून सगळ्यांनाच त्या संधीचा लाभ मिळेल. शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळाल्यानंतर त्याचा लाभ हा शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये उत्कर्ष निर्माण करणारा ठरतो. त्यामुळे या योजना आपल्याला कळाव्यात व त्याचे फायदे आपल्या लक्षात यावेत यासाठी आपण तालुक्यातील 17 विभागातील विविध गावांना एकत्र करून हा शासन दरबार भरवत असल्याचे मनोगतातून व्यक्त केले. माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांनी 20-25 वर्षांपूर्वी तालुक्याचा मागासलेपण जे होतं तो तालुका पाणीदार झाल्यामुळे इथल्या विकासाला बळ आलं .इथला शेतकरी सदन झाला. त्यामुळे ज्या गोरगरीब जनतेने मला स्वतःच्या खिशातले पैसे घालून नामदार केलं आणि कृष्णा खोरे माझ्या ताब्यात आल्यामुळे मी तालुक्याचा विकास साधण्यास यशस्वी झालो असे मत त्यांनी व्यक्त केले. तर तहसिलदार राजेश चव्हाण यांनी शासनाच्या विविध योजना या गावच्या विकासासाठीच असतात. गावातील गट तट बाजूला सारून गाव एकत्र आल्यास गावचा विकास साधला जातो व अनेक प्रश्न मार्गी लागले जातात. यासाठी गावागावानी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन गावातील सुधारणा करून घ्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या निमित्ताने सतरा विभागातील उल्लेखनी काम करणाऱ्या महिला व नागरिकांचा यथोचित सन्मान यावेळी करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अरविंद पठाणे, कृषी अधिकारी शरद पोळ उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदानंद पाटील यांनी केले तर आभार तलाठी विठ्ठल शिवनगेकर यांनी मानले.





No comments:

Post a Comment