चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील सर्व गावातील मतदार याद्यांचे शुद्धीकरण व गावातील मतदान केंद्रांचे व्हेरिफिकेशन करण्याचे प्रशिक्षण प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संपन्न झाली. चंदगड तहसील कार्यालयाच्या सभागृहात ही सभा संपन्न झाली.
सुरुवातीला निवडणूक नायब तहसीलदार सचिन आखाडे यांनी प्रास्ताविक केल्यानंतर प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी चंदगड तालुक्यातील सर्वच गावांमध्ये मयत मतदार व स्थलांतरित मतदार कमी करणे व नवीन मतदारांची नोंदणी करणे यासाठी गावातील मतदार याद्यांचे शुद्धीकरण करून मतदान दिवशी होणाऱ्या मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदार याद्या अध्यावत शुद्धीकरण करणे.
यामध्ये चुकीचे नाव, वय, लिंग व मतदान कार्डला आधार लिंक करून घेणे . मतदार यादी मधील ८० वर्षावरील मतदारांची पडताळणी तसेच कृष्णधवल मतदारांची व्हेरिफिकेशन व पुसट असलेले फोटो यांची दुरुस्ती करणे यासाठी केंद्र स्तरावर निवडलेल्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच गावातील मतदान केंद्राची इमारत सुस्थितीत राहण्यासाठी व केंद्राबाहेरील स्थिती. केंद्र परिसरात २०० मीटरवर राजकीय पक्षांचे कार्यालय आहे का? अपंगांच्या सुविधा मतदान केंद्रावरती आहेत का? मतदान केंद्रात विज जोडणी आहे का? याबाबत तपासणी होणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मतदार यादीमध्ये मतदान क्षेत्र अचूक व पूर्ण दर्शविलेले आहे का? या व इतर सुविधांच्या बाबतीत मार्गदर्शन करण्यात आले. नव मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी तालुक्यातील महाविद्यालय प्राचार्य यांची बैठक घेण्यात आली. नवीन ऍडमिशन घेतेवेळी मतदार यादीत नाव नोंदणी करण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात याव्यात व नव मतदारांची नोंदणी वाढवावी अशा सूचना देण्यात आल्या.
तसेच महिला मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच डीआरडीओ विभागाचे प्रमुख यांची बैठक घेऊन महिलांची नाव नोंदणी कशी वाढेल याबाबत सूचना दिल्या. यावेळी चंदगडचे तहसीलदार राजेंद्र चव्हाण, गटशिक्षणाधिकारी सुमन सुभेदार उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment