नांदवडे येथे केएलई हॉस्पीटल व ग्रुप ग्रामपंचायत नांदवडे-शेवाळे यांच्या संयुक्त विद्यमाने २० मे रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर - चंदगड लाईव्ह न्युज

19 May 2023

नांदवडे येथे केएलई हॉस्पीटल व ग्रुप ग्रामपंचायत नांदवडे-शेवाळे यांच्या संयुक्त विद्यमाने २० मे रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

  नांदवडे (ता. चंदगड) येथे केएलई हॉस्पीटल डिपार्टमेंट ऑफ गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी व ग्रुप ग्रामपंचायत नांदवडे – शेवाळे यांच्या संयुक्त विद्यमाने नांदवडे येथील माऊली मंदिर येथे शनिवार २० मे २०२३ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत होत असल्याची माहीती के. एल. ई. चे पीआरओ सुनिल शिंदे यांनी दिली. 

    या शिबीरामध्ये सुप्रसिध्द पोट विकार तज्ञ, लिव्हरतज्ञ, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. संतोष हजारे रुग्णांची तपासणी करणार आहेत. यामध्ये पोट दुःखी, लिवरला सुज येणे, पोट फुगणे, गॅस, सिडीटी, अपचन, बद्धकोष्टता, हिपॅटायटीस (काविळ) लठ्ठपणा, पोट साफ न होणे, लहान आणि मोठ्या आतड्याचे अल्सर, लिव्हर किंवा पित्ताशयचे आजार यासह मोफत कावीळ तपासणी, अत्याधुनिक मशीनच्या साहाय्याने मोफत लिव्हर तपासणी होणार आहे. रुग्णांनी नाव नोंदणीसाठी पीआरओ सुनिल शिंदे यांच्याशी 8275907070 या मोबाईलवर संपर्क साधावा. या मोफत आरोग्य शिबीराचा लाभ परिसरातील रुग्णांनी घ्यावा असे आवाहन ग्रुप ग्रामपंचायत नांदवडे-शेवाळे यांच्या वतीने केले आहे. 

No comments:

Post a Comment