माडखोलकर महाविद्यालयाचे डाॅ. संजय पाटील यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी. पदवी प्रदान - चंदगड लाईव्ह न्युज

17 May 2023

माडखोलकर महाविद्यालयाचे डाॅ. संजय पाटील यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी. पदवी प्रदान

शिवाजी विद्यापीठाकडून " स्वातंत्र्योत्तर हिंदी साहित्यकारों की जीवनियों का अनुशीलन" या शोध प्रबंधासाठी पीएच. डी. पदवी प्रदान."

प्रा. डॉ. संजय नारायण पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

खेडूत शिक्षण मंडळ, कालकुंद्री संस्थेच्या र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. संजय नारायण पाटील यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्याकडून "स्वातंत्र्योत्तर हिंदी साहित्यकारों की जीवनियों का अनुशीलन" या शोध प्रबंधासाठी पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांना या शोधकार्यासाठी नेसरी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. के. आर. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील, माजी हिंदी विभागाध्यक्ष डाॅ. पी. एस. पाटील, डॉ. अर्जुन चव्हाण, डाॅ. पद्मा पाटील यांची प्रेरणा व प्रोत्साहन मिळालेे. त्यांना नुकताच शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ट प्रोग्राम ऑफिसर व उत्कृष्ट एन. एस. एस. एककासाठीचा प्रथम पुरस्कार कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व प्र. कुलगुरु डाॅ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्दल व सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
No comments:

Post a Comment