राज्यस्तरिय जलतरण स्पर्धेत भगतसिंग गावडेला एक सुवर्ण पदकासह तीन कास्य पदके - चंदगड लाईव्ह न्युज

17 May 2023

राज्यस्तरिय जलतरण स्पर्धेत भगतसिंग गावडेला एक सुवर्ण पदकासह तीन कास्य पदके

भगतसिंग गावडे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       कौलव स्विमिंग क्लब व हिंदवी कला क्रीडा मंडळ यांच्यावतीने भोगावती येथे पार पडलेल्या. राज्यस्तरिय जलतरण स्पर्धेत भगतसिंग गावडे याने विविध प्रकारात एक सुवर्ण पदकासह तीन कास्य पदके पटकावली.  त्याला रोख बक्षीस आणि मेडल देऊन गौरविण्यात आले त्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

    भगतसिंग यांने यापूर्वीही अनेक स्पर्धांमध्ये सुवर्ण आणि कास्य पदके मिळवली आहेत. सध्या तो बेळगाव येथील केएलई स्विमिंग क्लबमध्ये प्रशिक्षण घेत आहे. या कामी त्याला स्विमिंग क्लबचे अजिंक्य, अतुल, अजित यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:

Post a Comment