गुडेवाडी येथील नवदाम्पत्याने विवाहाच्या निमित्ताने विद्यालयाला भेट दिला ग्रीन बोर्ड - चंदगड लाईव्ह न्युज

20 May 2023

गुडेवाडी येथील नवदाम्पत्याने विवाहाच्या निमित्ताने विद्यालयाला भेट दिला ग्रीन बोर्ड

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

     स्वामी विवेकानंद विद्यालयाचा माजी विद्यार्थी अविनाश कोकितकर यांचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. अविनाशचे माध्यमिक शिक्षण स्वामी विवेकानंद विद्यालयात झाले. आमची शाळा आणि शाळेतील तो काळा फळा पहातच अविनाश चे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. आज नवदांपत्य उच्चशिक्षित आहेत. शिक्षण क्षेत्रात अनेक शैक्षणिक साधनांची निर्मिती झाली आहे. अविनाशने विचार केला आपण विद्यालयातील काळा फळा बदलवून त्या ठिकाणी ग्रीन बोर्ड दिला तर येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा उपयोग होईल. आणि लग्नाच्या स्वागत समारंभाच्या निमित्ताने दहा हजार रुपये किमतीचा ग्रीन बोर्ड विद्यालयाला भेट दिला.

       विवाह ही केवळ कुटुंबातील महत्त्वाची घटना नसून तिचे समाजाच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व आहे. आज लग्न समारंभावर मोठा खर्च होताना दिसतो आहे. यामधील थोडासा खर्च शाळेतील भौतिक सुविधांवर केल्यास शाळेचे रूप बदलू शकेल. तो दिवस वधू-वरांच्या स्मरणात राहील. कोणतेही नववधू हे कोणत्यातरी शाळेचे माजी विद्यार्थी असतात.सौ अस्मिता व अविनाश, विवाह निमित्त आपण घेतलेला निर्णय समाजाला नक्कीच प्रेरणा देईल.

      ध्येय असावे उंच तुमचे,

   मिळाव्यात त्यांना नव्या आशा..

  सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत तुमची,

   ह्याच विवाहाच्या शुभेच्छा..!


No comments:

Post a Comment