नांदवडे येथे केएलई मार्फत घेण्यात आलेल्या पोट विकार शिबिरात दोनशेहून अधिक रुग्णांची तपासणी - चंदगड लाईव्ह न्युज

20 May 2023

नांदवडे येथे केएलई मार्फत घेण्यात आलेल्या पोट विकार शिबिरात दोनशेहून अधिक रुग्णांची तपासणी

शिबिरात सहभागी झालेले लाभार्थी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

 के एल इ संस्थेचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांच्या संकल्पनेतून नांदवडे (ता. चंदगड) येथे आज के एल इ हॉस्पिटल मार्फत घेण्यात आलेले मोफत पोट विकार शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरासाठी सुप्रसिद्ध डॉ. संतोष हजारे यांनी स्वतः उपस्थित राहून रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये 200 रुग्णांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

 त्यांच्यासोबत 25 सहाय्यक डॉक्टरांची टीम होते. त्यांचे स्वागत व प्रास्ताविक के एल इ हॉस्पिटल चे जनसंपर्क अधिकारी सुनील शिंदे यांनी केले.

   या शिबिरामध्ये बीपी शुगर त्याचबरोबर कावीळ तपासणी आणि अत्याधुनिक मशीनच्या सहाय्याने लिव्हरची कार्यक्षमता तपासणी मोफत सोय करण्यात आली. या तपासणीसोबत पेशंटला औषधे ही मोफत देण्यात आले. या शिबिराचा पंचक्रोशीतील साधारणतः 200 लोकांनी लाभ घेतला. ग्रुप ग्रामपंचायत नांदवाडे मार्फत आयोजित केलेल्या शिबिरासाठी सरपंच राजेंद्र कांबळे, उपसरपंच एन. एस. पाटील, संतोष मळविकर, शिवाजी गावडे, सुधाकर पाटील,  विद्यानंद सुतार, विठ्ठल गावडे, दयानंद गावडे, पी आर ओ रोहित पाटील, तेजस सरशेट्टी यांनी विशेष  परिश्रम घेतले. आभार विठ्ठल गावडे यांनी मानले.



No comments:

Post a Comment