तब्बल वीस वर्षांनी भरली पुन्हा ताम्रपर्णीची शाळा...... - चंदगड लाईव्ह न्युज

21 May 2023

तब्बल वीस वर्षांनी भरली पुन्हा ताम्रपर्णीची शाळा......कालकुंद्री: सी. एल. वृत्तसेवा

      ताम्रपर्णी विद्यालय शिवनगे (ता. चंदगड) येथील इयत्ता दहावीच्या सन २००२-०३ या शैक्षणीक वर्षांच्या बॅच चार स्नेहमेळावा नुकताच  विद्यालयात संपन्न झाला. नोकरी, उद्योग, व्यवसाय, शेती व लग्नामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेले वर्गमित्र २० वर्षांनी "भिरभिरत्या पाखरांना संधी ही नामी आली, घरटयात परतुनिया येण्याची वेळ झाली" म्हणत  एकत्र आली.

      कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार कै. नरसिंगराव भुजंगराव पाटील यांच्या समाधीचे व पुतळ्याचे पुजनाने झाली. विद्यालयाच्या माहेरवासिन विद्यार्थिनींनी शिक्षकांचे औक्षण करून पुष्पवृष्टीने स्वागत केले. कै. ए. एस. कुलकर्णी, कै. पी. के. पाटील, कै. एम. ए. वामणे, कै. पी. एन. पाटील, कै. एम. डी. कांबळे, कै. मलप्रभा पाटील, कै. राजू नरी यांना आदरांजली वाहण्यात आली.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याद्यापक डी. जे. पाटील होते. प्रास्ताविक दीपक माने यांनी केले. आर. आय. पाटील, आर.आय. हंप्पन्नावर, पी. जे. धुरी, एन. पी. पाटील, पी.एस. कांबळे यांचा  सन्मान करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी लक्ष्मण फाटक, संदिप पाटील ,विनोद मुंगार, विनोद झेंडे, संदिप नार्वेकर, मंदार पाटील, चामजी झेंडे, नमता पाटील, दीपा कांवळे यांनी मनोगत व्यक्त केले. 

    आर. आय. हंप्पन्नावर यांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा व आपण चांगले नागरीक बना असे मार्गदर्शन केले. आर. आय. पाटील, पी.जे. धुरी आदींनी मागर्दशन केले. विजय आवडणकर, एकनाथ मोरे, श्रीकांत वेळगावकर, युवराज कांबळे, अनिल जाधव महादेव वंजारी नामदेव गावडे, सदानंद खेबुडे, प्रविण सातार्डेकर, ज्ञानेश्वर कांवळं, सतिश हलकर्णीकर राजू गावडे, दीपाली मुंगारे, राजश्री सांवरेकर, नमिता सांवरेकर, रोहीणी जाधव, मनिषा नाकाडी, अनिता मुंगारे, सुलोचना सांबरेकर आदी माजी विद्यार्थी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नमता पाटील यांनी केले. विनोद झेंडे यांनी आभार मानले.
No comments:

Post a Comment