स्नेहमेळाव्यातून नव्याने एकत्र येण्यासाठी मिळाले बळ, हेरे येथील सह्याद्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला विश्वास - चंदगड लाईव्ह न्युज

23 May 2023

स्नेहमेळाव्यातून नव्याने एकत्र येण्यासाठी मिळाले बळ, हेरे येथील सह्याद्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला विश्वास

  

हेरे येथे स्नेह मेळाव्यावेळी उपस्थित माजी विद्यार्थी

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

      जुन्या आठवणींना उजाळा देऊन एकमेकांच्या सुखदुःखात एकसंध राहण्यासाठी  स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून पुन्हा नव्याने बळ मिळाल्याचा विश्वास  हेरे येथील सह्याद्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केला. नुकताच झालेल्या कार्यक्रमात १९९५ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी २७ वर्षांनंतर पुन्हा  शाळेतील आठवणी जागवल्या. 

   सुरुवातीला प्रवीण पवार यांनी स्नेहमेळाव्याचा उद्देश सांगितला. त्यानंतर वर्गमित्र विशाल बल्लाळ हा हेरे गावचा उपसरपंच झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर विविध क्षेत्रात कार्यरत असून पूर्वीप्रमाणेच यापुढीलही  काळात एकत्र राहून एकमेकांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार केला. यावेळी रविराज बोकडे, तुकाराम धुरी, समीर मदार, कांचन बोर्डे, संजिवनी गुरव यांच्यासह ६० विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment