चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी सांगता व कृतज्ञता पर्व २०२३ अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सर्वांनी शंभर सेकंद स्तब्धता व मौन बाळगुन छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली वाहिली. राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. यु. एस. पाटील आणि मराठी विभाग प्रमुख डॉ. अनिल गवळी यांनी आपल्या मनोगतातून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment