शिवनगे येथील वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू - चंदगड लाईव्ह न्युज

08 May 2023

शिवनगे येथील वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 
         खेडूत शिक्षण मंडळाच्या शिवनगे (ता. चंदगड) येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांसाठी अनु. जाती, अनु. जमाती, विमुक्त जाती, व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, आर्थिक मागास या प्रवर्गातील इ. ५ वी ते इ १० वी च्या वर्गातील विदयार्थ्यांना मोफत प्रवेश देणे सूरु आहे. राहण्याची, जेवणाची सोय, अंथरूण, पांघरूण इत्यादी सर्व सुविधा मोफत आहेत. तरी विदयार्थ्यांनी  आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला व रहिवाशी दाखल्यासह वसतिगृहाचे अध्यक्ष  ए. एन. पाटील व अधिक्षक नवनीत परशराम पाटील यांच्याशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी ९०७५४२७७५२ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment