प्रा. डॉ. नागेंद्र जाधव यांचा सत्कार करताना मान्यवर.
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
सावंतवाडी (जि. सिधुदुर्ग) येथील श्री पंचम खेमराज विधी महाविद्यालयात आयोजित तृतीय वर्ष विधी विभागातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. यावेळी तृतीय वर्ष विधी विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
त्याच बरोबर प्रथम वर्ग विधी विभागातील विदयार्थी प्रा. डॉ. नागेंद्र जाधव यांचाही न्याय निवाडा लोकनेता फौंडेशन दिल्ली मुख्यालय हुपरी कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी (ग्रामीण) निवड झाल्याबद्दल विधी महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे अध्यक्ष युवराज लखम सावंत भोसले, प्रमुख पाहुणे ॲड. परिमल नाईक, विश्वस्त शामराव सावंत, प्राचार्या अश्विनी लेले, प्रा. पूजा जाधव, सर्व प्राध्यापक गुरुवर्य, विदयार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment