आसगाव येथील कमळाबाई गावडे यांच्या घरी आली लाईट, आम. सतेज पाटील यांचे सहकार्य - चंदगड लाईव्ह न्युज

12 June 2023

आसगाव येथील कमळाबाई गावडे यांच्या घरी आली लाईट, आम. सतेज पाटील यांचे सहकार्य

 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

आसगाव (ता. चंदगड) येथील श्रीमती कमळाबाई सट्टू गावडे (वय वर्ष ९५ ) आजीच्या घरी बऱ्याच वर्षांनी पडला प्रकाश कोल्हापूरचे माजी पालकमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील  यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलर लँप सिस्टीम (सतेज सौर ऊर्जा) ह्या उपक्रमातुन लाईट जोडली.जिल्ह्यात ज्या कुटुंबाच्या घरी लाईट नाही त्यांना सोलर लाईट जोडण्याचा मानस आम.पाटील यांचा मानस आहे.

   घरात लाईट आल्याने कमळाबाई सह संपूर्ण कुटुंब आनंदीत झाले. चेहऱ्यावर एक समाधान होते कमळाबाई यांची मुलगी केरूबाई, नातू, नातसून  यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. आम. सतेज पाटील यांचे आभार मानून आजींनी आशीर्वाद दिले.  

  या कामी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य जे के पाटील यांनी विशेष प्रयत्न केल्याबद्दल कमळाबाई या आजीने  पेढा भरवून त्यांचेही आभार मानले. यावेळी विशाल पाटील, एम. जे. पाटील, विलास पाटील, राजेंद्र परीट, अभिजित गुरबे, अशोक दाणी, रघुनाथ नाईक, मल्लू गावडे, नारायण हसबे, उदय देसाई, अक्षय करबंळकर, विक्रम पेडणेकर, सागर पाटील आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment