माणगाव येथील मत्स्य शेतकरी उत्पादक संस्थेला नोंदणीपत्र - चंदगड लाईव्ह न्युज

11 June 2023

माणगाव येथील मत्स्य शेतकरी उत्पादक संस्थेला नोंदणीपत्र

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      माणगाव (ता. चंदगड) येथील चंदगड तालुका मत्स शेतकरी सहकारी संस्थेला सहाय्यक निबंधक सहकारी संस्था( दुग्ध ) कोल्हापूर यांनी केपीआर /सीजीडी/एजीआर (ओ)/६९८५ (डी) सन २०२३-२०२४ या नंबरचे नोंदणी प्रमाणपत्र दिले.

  सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांच्याहस्ते संस्थापक संजय शिंदे, अध्यक्ष सुरेश बागडी, उपाध्यक्ष चंद्रकांत बागडी, सचिव राजु बागडी, सुभाष बागडी यांनी कोल्हापूर येथे नोंदणीपत्र स्वीकारले. यावेळी संचालक भगवंत बागडी, शंकर बागडी, परशराम बागडी, दत्ता गोंधळी, किरण काबंळे, वैजनाथ बागडी, प्रकाश बागडी, सौ. गौरी बागडी, सौ. लता बागडी आदी उपस्थित होते.No comments:

Post a Comment