कालकुंद्री येथे शिवजयंती उत्सव मंडळ कडून वाचनालयास ऐतिहासिक पुस्तके देणगी - चंदगड लाईव्ह न्युज

11 June 2023

कालकुंद्री येथे शिवजयंती उत्सव मंडळ कडून वाचनालयास ऐतिहासिक पुस्तके देणगी

कालकुंद्री  (ता. चंदगड) येथे शिवजयंती उत्सव मंडळ सदस्यांकडून ऐतिहासिक पुस्तके स्वीकारताना वाचनालयाचे पदाधिकारी.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
      कालकुंद्री  (ता. चंदगड) येथील ज्ञानदीप वाचनालयास येथील शिवजयंती उत्सव मंडळाकडून ५ हजार रुपयांची ऐतिहासिक पुस्तके नुकतीच प्रदान करण्यात आली. कालकुंद्री येथे गेली अनेक वर्षे छत्रपती शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहाने व थाटामाटात साजरा केला जातो. 
    यंदा (२०२३) झालेल्या शिवजयंती उत्सव मधील शिल्लक रकमेतून वाचनीय ऐतिहासिक पुस्तके शिवजयंती उत्सव मंडळाने शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून वाचनालयास प्रदान केली. यात श्रीमानयोगी, छावा, दुर्योधन, बुद्धभूषण, महासम्राट, झंझावात, रणखैदळ, इथे ओशाळला मृत्यू, शिवरायांच्या शौर्य कथा, रायगड, पावनखिंड, भद्रकाली ताराराणी, क्रांतीसुर्य, अलेक्झांडर, द ग्रेट शहीद भगतसिंग, मराठे कालीन शौर्यकथा, श्रीमंत बाजीराव पेशवे, महाराणी येसूबाई, राजमाता जिजाऊसाहेब, सेनापती हंबीरराव मोहिते आदी महत्त्वपूर्ण पुस्तकांचा समावेश आहे.
      यावेळी उत्तम पाटील (किटवाड) या विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर भाषण केले.
     विनायक मुर्डेकर, संदीप कांबळे, संपत पाटील, युवराज पाटील आदींनी  मनोगते व्यक्त केली. स्वागत वाचनालयाचे सचिव शिवाजी पाटील यांनी केले. प्रास्ताविक के जे पाटील यांनी केले. सुत्रसंचालन युवराज पाटील यांनी केले. यावेळी संदीप कांबळे, गुंडू पाटील, सुदर्शन पाटील, सुरज पुजारी, संदीप पाटील, दिलीप पाटील, उत्तम पाटील, परशराम पाटील व  ग्रामस्थ उपस्थित होते. पी. एस. कडोलकर यांनी आभार मानले.



No comments:

Post a Comment