मार्गदर्शन करताना डॉ. देशमुख. शेजारी डॉ. आर. एन. साळुंखे. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
आज स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो आहे की पदवीनंतर काय? घाबरू नका. आज कोणत्याही शाखेतील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात काम करू शकतात. तसेच विविध विषयांमध्ये उच्चपदस्थ होऊ शकतात, फक्त जीवनात धैर्य व संयम सोडू नका. शेवटपर्यंत कष्टाची तयारी ठेवा. जीवनात संघर्ष आहे, तो प्रत्येकाला करावा लागेल. जेवढ्या लवकर कराल तेवढे लवकर यश प्राप्त होईल, असे प्रतिपादन प्रा. डॉ. ए. एस. देशमुख यांनी केले.
चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयातील करियर गायडन्स सेल व रसायनशास्त्र विभागामार्फत `करियर गायडन्स प्रोग्राम` आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील हे होते.
त्या पुढे म्हणाल्या की, ``कोणत्याही शाखेत यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास, संवाद कौशल्ये, योग्य प्रयत्न यांचीही जोड असायला हवी. वाचन, अभ्यास आणि इतरांचे अनुभव या बाबी व्यक्तिमत्व विकासासाठी पूरक आहेत. तसेच करियर घडविण्यासाठी न्यूनगंड दूर करून संधीचे रूपांतर सोन्यात करण्यास सज्ज राहण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविक समन्वयक डॉ. आर. एन. साळुंखे यांनी केले. आभार प्रा. एम. एस. दिवटे यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. एम. एम. माने, प्रा. सूर्यकांत गावडे, प्रा. श्रीपाद गावडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment