संत गजानन'च्या विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट मध्ये गरुडभरारी, ८०४ विद्यार्थ्यांना नोकऱ्या, प्रवेशासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

14 June 2023

संत गजानन'च्या विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट मध्ये गरुडभरारी, ८०४ विद्यार्थ्यांना नोकऱ्या, प्रवेशासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद

महागाव : टाटा अॉटोकॉम या कंपनीत निवड झालेल्या इंजिनिअर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमवेत ट्रेनिंग,प्लेसमेंट  व मार्गदर्शक शिक्षक.

महागाव / सी. एल. वृत्तसेवा

         महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज शिक्षण समूहातील शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये विविध विद्याशाखेतील ८०४ विद्यार्थ्यांना  राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यात नोकऱ्या मिळाल्या यासाठी दोन सत्रात एकूण ४२ कंपन्याकडून मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. या समुहातील  विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण न देता नोकरीबरोबरच सर्वागींन विकास व गुणवत्तेवर भर देत असल्याने विद्यार्थी परिपुर्ण घडत गरुडभरारी घेत आहेत. परिणामी या समुहात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्थ प्रतिसाद मिळत असल्याची माहिती संस्थाध्यक्ष ॲड. डॉ. आण्णासाहेब चव्हाण यांनी माहिती दिली.

        यामध्ये शैक्षणिक वर्षात पॉलिटेक्निक ४४८, इंजिनिअरिंग १२४ नर्सिंग, पॅरामेडिकल व फार्मसी या विभागात २३२ विद्यार्थ्यांची नामवंत कंपनी, रुग्नालय व शासकीय विभागात  निवड झाली. कॅम्पस ग्रामीण भागातील असूनही प्रथमपासूनच गुणवत्ता जपून नावलौकिक मिळवला आहे. उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, अभियंते, तंत्रज्ञ कंपन्यांना सहज उपलब्ध व्हावा यासाठी विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण दिला जातो यामध्ये विद्यार्थ्यांना अंतिम वर्षात  असतानाच ग्रुप डिस्कशन,माॕक इंटरव्यू,योग्यता परीक्षा,स्किल डेव्हलपमेंट कंपनीतील कामासाठी आवश्यक ट्रेनिंग देऊन प्रशिक्षण दिला जातो.याचा फायदा विद्यार्थ्यांना होवून  आपले नोकरीचा स्वप्न पूर्ण करत आहेत. यावर्षी प्रमुख उल्लेखनीय बाब म्हणजे इंजिनिअरिंग व पॉलिटिक्सच्या अनेक विद्यार्थ्यांना सर्वाधिक वेतन व कंपनीच्या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाल्या आहेत.

        शिवाय शेवटच्या वर्षात विद्यार्थी शिक्षण घेत असतानाच  नोकरीच्या संधी उपलब्ध होत असल्याने  विद्यार्थी व पालकवर्गात आनंदाचे वातावरण आहे. याकामी प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. संतोष गुरव, प्रा. सिदगोंडा जबडे, प्रा. कैवल्य मिरजकर, प्रा. रुकय्या देसाई, प्रा. राजश्री माने, प्रा. भाऊसाहेब आवळेकर, प्रा. विठ्ठल वडर यासह रजिस्टर शिरीष गणाचार्य व  शिक्षकांचे सहकार्य मिळाले.



No comments:

Post a Comment