कालकुंद्री येथे केंद्र शाळा आवारात २ लाखांचे पेविंग ब्लॉक बसवण्याच्या कामाचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

14 June 2023

कालकुंद्री येथे केंद्र शाळा आवारात २ लाखांचे पेविंग ब्लॉक बसवण्याच्या कामाचा शुभारंभ

कालकुंद्री येथे मुख्य चौकातील पेविंग ब्लॉक कामाचा शुभारंभ प्रसंगी एमजे पाटील, अशोक पाटील, सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          कालकुंद्री (चंदगड) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या गेट समोरील आवारात पेविंग ब्लॉक बसवण्याच्या कामाचा नुकताच शुभारंभ झाला. ग्रामपंचायत कालकुंद्रीच्या पंधरावा वित्त आयोग योजनेतून १ लाख ९९ हजार रुपये मंजुरीचे हे काम तसेच याच योजनेतील लोहार गल्ली मधील काम आठवडाभरात पूर्ण होईल, अशी माहिती उपसरपंच संभाजी पाटील यांनी दिली. पेविंग ब्लॉक पासून मुख्य रस्त्यापर्यंतचा भाग काँक्रिटीकरण होणार आहे. कामाच्या शुभारंभ प्रसंगी सरपंच छाया जोशी, सदस्य प्रशांत मुतकेकर, अझहर शेख, विठ्ठल पाटील, विलास शेटजी, गीता नाईक विजया कांबळे, ग्रामसेवक दत्ता नाईक, एम. जे. पाटील, अशोक पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment