दहावी बोर्ड परिक्षेचा निकाल जाहिर - चंदगड तालुक्याचा सरासरी ९७.५३% निकाल, ३७ हायस्कूलने केली शंभरी पार - चंदगड लाईव्ह न्युज

02 June 2023

दहावी बोर्ड परिक्षेचा निकाल जाहिर - चंदगड तालुक्याचा सरासरी ९७.५३% निकाल, ३७ हायस्कूलने केली शंभरी पार

 तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा (एस. के. पाटील)

        महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने - मार्च  २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या १० वी बोर्ड परिक्षेचा चंदगड तालुक्याचा  ९७.५३ टक्के निकाल लागला.

कोवाड केद्रात ९५ . ६० % गुण मिळवून प्रथम आलेली तेऊरवाडीची कु . रिया गडकरी हि चे पेढे भरवून अभिनंदन करताना आई वडील
      चंदगड तालुक्यातील ६७ माध्यमिक विद्यालयातील २४७९ विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. त्यापैकी २४७७ विद्यार्थ्यानी प्रत्यक्ष परिक्षा दिली. यामधील २४१६विद्यार्थी उत्तीर्ण झाले. संजय गांधी  विद्यालय नागनवाडी च्या राजनंदिनी संदिप गावडे हिने ९८.८० % गुण मिळवून तालूक्यात प्रथम क्रमांक मिळवला. चंदगड तालूक्यातील १०९५ विद्यार्थी विशेष श्रेणीत, प्रथम श्रेणीमध्ये ८६७, द्वितिय श्रेणीमध्ये ३८६ तर ६८ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले. एकुण २४१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

अडकूर येथे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यींनीचे अभिनंदन करताना पालक

       १२ वी च्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले होते तर १० वी च्या विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळाल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले. नवीन केंद्र प्रणाली, पर्यवेक्षक योजना, बैठे पथक असूनही विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. गतवर्षी ६० माध्यमिक शाळांचा निकाल १०० % लागला होता तर यावर्षी यामध्ये घसरण होऊन ३७ शाळांचा निकाल १०० % लागला.

        चंदगड तालूक्यातील ६४ मराठी माध्यम व ३ इंग्रजी माध्यम अशा ६७ माध्यमिक विद्यालयांचा  निकाल पुढील प्रमाणे -


1) श्री सरस्वती विद्यालय, कालकुंद्री - ९७ ७७


2) श्रीराम विद्यालय, कोवाड -१००


3) श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, माणगाव - ९८ ३६


4) ताम्रपर्णी विद्यालय, शिवनगे - १००


5) श्री छत्रपती शहाजी हायस्कूल, पाटणे - १००


6) मामासाहेबलाड विदयालय, ढोलगरवाडी - ९६ . ९६


7) श्री रामलिंग हायस्कूल, तुडये - ९८ . ८३


8) श्री नरसिंग हायस्कूल, निट्टूर - १००


9) सह्याद्री विद्यालय, हेरे - ९८.३०


10) जयप्रकाश विद्यालय, किणी -१००


11) संजय गांधी विद्यालय, नागनवाडी -१००


12) हलकर्णी हायस्कूल, हलकर्णी - ९५ .५२


13) धनंजय विद्यालय, नागनवाडी -१००


14) राजगोळी खुर्द हायस्कूल, राजगोळी खुर्द - ९५ . ५५


15) वसंत विद्यालय, शिनोळी खुर्द - ८८ . ८८


16) श्री मल्लनाथ हायस्कूल, कानूर खुर्द - ९७ . ६१


17) श्री माऊली विद्यालय, तिलारीनगर - १००


18) श्री वैजनाथ विद्यालय, देवरवाडी - ९७ . ७७


19) डुक्करवाडी विद्यालय, बागिलगे - १००


20) साई विद्यालय, ईब्राहिमपूर - १००


21) यशवंतराव चव्हाण हायस्कूल, सुरुते - १००


22) श्री नागनाथ हायस्कूल, नागरदळे - १००


23) प्रो. नामदेवराव दुंडगेकर हायस्कूल, मलतवाडी - १००


24) श्री व्ही. के. चव्हाण-पाटील विद्यालय, कागणी - १००


25) संत तुकाराम हायस्कूल, सुंडी - १००


26) ब्रह्मलिंग विद्यालय, हाजगोळी - ९१ ४२


27) श्री भावेश्वरी विद्यालय, नांदवडे - ८३ . ८७


28) श्री हनुमान विद्यालय, मांडेदुर्ग -१००


29) चंदगड उर्दु हायस्कूल चंदगड - १००


30) सौ. चव्हाण-पाटील गर्ल हायस्कूल, निट्टूर - ९५ .४५


31) भावेश्वरी विद्यालय, आमरोळी - ९४ . ८७


32) वसंतदादा पाटील विद्यालय, जंगमहट्टी - १००


33) जी जी व्ही पाटील माध्यामिक विद्यालय, म्हाळेवाडी - ९३.३३


34) स्वयंभू माध्यमिक विद्यालय, उमगाव -१००


35) दुंडगे माध्यमिक विद्यालय, दुंडगे - १००


36) न्यू हायस्कूल, अलबादेवी   - १००


37) भावेश्वरी विद्यालय, बसर्गे - ९४ . २८


38) आदर्श हायस्कूल, कामेवाडी - १००


39) भरमू पाटील हायस्कूल, होसूर - १००


40) तेऊरवाडी माध्यमिक विद्यालय, तेऊरवाडी -१००


41) एन. एस. पाटील माध्यमिक विद्यालय, होसूर - १००


42) छत्रपती शाहू माध्यमिक विद्यालय, ढेकोळी - ९४ . ४४


43) श्री दत्त हायस्कूल, राजगोळी - ९७ . २९


44) भाई दाजीबा देसाई विद्यालय, पार्ले - १००


45) स्वामी विवेकानंद विद्यालय, गुडेवाडी . १००


46) श्री भावेश्वरी संदेश विद्यालय, कानूर बु. - ८८ . ३७


47) स्वामी विवेकानंद विद्यालय, दाटे - १००


48) सातेरी विद्यालय, कोलिक - ९४ . ७३


49) शिवराज विद्यालय, महिपाळगड - ८७ . ५०


50) आसगांव माध्यमिक विद्यालय, आसगांव - १००


51) श्री रवळनाथ माध्यमिक विद्यालय, चंदगड - ९४ . ५९


52) श्री चाळोबा माध्यमिक विद्यालय, सातवणे -१००


53) राजर्षी शाहू माध्यमिक विद्यालय, शिनोळी बु. - १००


54) कलानंदीगड विद्यालय कलिवडे, आंबेवाडी - ७५


55) श्री सातेरी विद्यालय, कोकरे - १००


56) श्री सोमनाथ विद्यालय, हिंडगाव - १००


57) श्री हनुमान विद्यालय, करंजगाव - ८५ . १७


58) विवेक इंग्लिश मिडियम स्कूल, हलकर्णी - ९७ ४३


59) सेंट स्टिफन इंग्लिश मिडियम स्कूल, चंदगड - १००


60) कारमेल आशिष कान्व्हेंट स्कूल, अडकूर - १००


६१ ) आदर्श विद्यालय इसापूर - ९३. ७५


  ६२ ) न्यू इंग्लीश स्कूल चंदगड - ९७ . १२

.

६३ ) महात्मा फुले विद्यालय कार्वे - ९७ . ४६


६४ ) जनता विद्यालय तुर्केवाडी - १००


६५ ) श्री शिध्देश्वर हायस्कूल कुदनूर - १००


६६ ) श्री शिवशक्ती हायस्कूल अडकूर - ९३.५४


६७ ) चंदगड उर्दू हायस्कूल चंदगड . १००

       

       दुपारी १ वाजता निकाल जाहिर होताच मोबाईलवर व नेट कॅफेमध्ये सर्वच विद्यार्थ्यानी आपल निकाल मिळवला. सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.

No comments:

Post a Comment