चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयाच्या १७ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्यूमधून रिलेशनशिप मॅनेजरपदी नियुक्ती - चंदगड लाईव्ह न्युज

05 June 2023

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयाच्या १७ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्यूमधून रिलेशनशिप मॅनेजरपदी नियुक्ती


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात  दि. २९ एप्रिल २०२३ रोजीआयसीआयसीआय बँकेच्या वतीने कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन करण्यात आले होते.

     रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी पदे भरावयाची होती. सर्व शाखेतील पदवीधर विद्यार्थी तसेच बारावीच्या परीक्षेत ५० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले विद्यार्थी या नियुक्तीस पात्र होते. सदर कॅम्पस इंटरव्यूला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. या मुलाखतीतून १७ विद्यार्थ्यांची  रिलेशनशिप मॅनेजर या पदावर निवड करण्यात आली. त्यांना वार्षिक दोन लाख 70 हजार ते तीन लाख २४ हजार इतके वेतन मिळणार आहे. १९ ते २५ वयोगटातील या उमेदवारांना भविष्यातही चांगल्या करिअरची संधी आहे. महाविद्यालयाच्या या उपक्रमाबद्दल परिसरातून प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील व करिअर गायडन्स व प्लेसमेंट सेल चे प्रमुख डॉ. आर. एन. साळुंखे यांचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment