चंदगडला ६ ते १० जून दरम्यान मृत्युंजय महादेव मंदिराचा कलशारोहण, प्राणप्रतिष्ठापना सोहळा, भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

05 June 2023

चंदगडला ६ ते १० जून दरम्यान मृत्युंजय महादेव मंदिराचा कलशारोहण, प्राणप्रतिष्ठापना सोहळा, भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड येथील प्राचीन जागृत देवस्थान मृत्युंजय महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा मंगळवार दि. ६ ते शनिवार १० जून दरम्यान होणार आहे. १० जूनला महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. 

      मंगळवार दि. ६ जून रोजी सकाळी १० वाजता देवता प्रार्थना, महासंकल्प, गणपती पूजन, पुण्याहवाचन, देवानंदी, आचार्यदि ऋत्विकवरण, गणपती अथर्वशीर्ष आणि रूद्र पारायण आरंभ, पंचगव्य हवन, सायंकाळी गेह परिग्रह, सप्तशुद्धी राक्षोघ्न हवन, प्रासाद वास्तू चंदगड येथील मृत्युंजय महादेव मंदिर, हवन, प्राकार बली.

      बुधवार दि. ७ हवन, प्रतिष्ठा हवन, गोदान, रोजी गणपती हवन, पूर्ण नवग्रह फलदान, शुभ मुहूर्तावर बिंब प्रतिष्ठा, हवन, शांती हवन, बुधवार दि. ७ शिखर प्रतिष्ठा, शिखर कलशाभिषेक, जून रोजी सकाळी ८ वाजता गणपती महापुजा, सायंकाळी ५ वाजता हवन, पूर्ण नवग्रह हवन, शांती हवन, ब्रम्हकलश पुजन आरंभ, रूद्र सायंकाळी ७.३० वाजता बिंब शुद्धी, पारायण, कलशाधिवास होईल.

       गुरुवार दि. ८ जून ब्रम्हकलशाभिषेक, महापूजा, गणपती रुद्रमंत्र पूजन, देवता, श्री मृत्युजय महादेव मंदिर कलशस्थापन, अग्नीमंथन पूर्वक अग्नी जनन, अष्टसेवा. शुक्रवार दि. ९ जून रोजी सकाळी ८ अधिवास हवन, अष्टबंध पूजन, वाजता चतुद्रव्य गणपती हवन, शाय्याधिवास. 

       शनिवार दि. १० जून रोजी सकाळी ७ वा. गणपती हवन, महारुद्र हवन, महापूजा, आचार्य पूजन, ब्राह्मण- सुवासिनी कुमारिका पूजन, महामंत्राक्षता, आशीर्वचन, दुपारी १२ पासून महाप्रसाद होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment