पर्यावरण रक्षणासाठी 'पारगड हेरिटेज रन' सारख्या स्पर्धा झाल्या पाहिजे - आमदार राजेश पाटील, पारगड मॅरेथॉन स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, दिल्लीच्या ३३० स्पर्धकांचा सहभाग - चंदगड लाईव्ह न्युज

05 June 2023

पर्यावरण रक्षणासाठी 'पारगड हेरिटेज रन' सारख्या स्पर्धा झाल्या पाहिजे - आमदार राजेश पाटील, पारगड मॅरेथॉन स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, दिल्लीच्या ३३० स्पर्धकांचा सहभाग

मान्यवरांसोबत २१ किमी मॅरेथॉन स्पर्धेच्या पुरुष व महिला गटातील विजेते

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         पर्यावरण संतुलनसाठी वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. याच्या प्रबोधनासाठी `पारगड हेरिटेज रन` सारख्या स्पर्धांची गरज आहे. असे प्रतिपादन आमदार राजेश पाटील यांनी केले. ते जागतिक पर्यावरण दिनानिमित्त किल्ले परगड (ता. चंदगड) येथे आयोजित 'पारगड हेरिटेज रन' मॅरेथॉन स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्टॉफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन चिरमुरे होते.

          निसर्ग पर्यटन, निसर्ग संवर्धन व लोक प्रबोधनासाठी 'पारगड हेरिटेज रन' मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दरवर्षी करण्यात येते. 

भवानी मंदिर किल्ले पारगड  येथून सकाळी ७ वाजता स्पर्धेची सुरुवात झाली. २१ किमी  जंगल हाफ मॅरेथॉन पुरुष विभागात अनुक्रमे विवेक मोरे (दाटे), अनिकेत कुट्रे (चंदगड), परशराम भोई (गडहिंग्लज) तर महिला गटात रोहिणी लक्ष्मण पाटील (गडहिंग्लज), भक्ती सुनील पोटे (गडहिंग्लज), प्रेयसी चारी (गोवा) विजेते ठरले. 

       १० किमी जंगल ड्रीम रन पुरुष विभागात रोहित रामा, युवराज मारुती वाकसे, अभिषेक तानाजी नाईक तर महिला विभागात चंदना विठ्ठल गोरुले (गडहिंग्लज), जानवी पांडुरंग मोहनगेकर ( किणी), डॉ रूपा रोहित कापडिया (मुंबई) यांनी बाजी मारली. 

     ५ किलोमीटर जॉय ऑफ जंगल गटात पृथ्वीराज रमेश कांबळे (महागाव), प्रथमेश पुंडलिक जाधव (वडरगे), तेजस आनंद बोडेकर (कोल्हापूर) तर महिला गटात सन्मई राहुल शिंदे (उजळाईवाडी), वेदांती बाळाराम जोशीलकर (किणी), प्रेरणा पुंडलिक जोशीलकर (किणी) विजेते ठरले. 
       जॉय ऑफ जंगल ५ किमी ८ ते १४ वर्षे वयोगटात ईशांत गजानन कदम, जय पांडुरंग मोहनगेकर, श्रीयश संजय बिर्जे सर्व (जयप्रकाश विद्यालय किणी), मुली  गटात अमृता अशोक पाटील (जकनहट्टी), साक्षी सुरेश दळवी (कळसगादे), सिद्धी काशिनाथ देवणे (सांबरे) विजेते ठरले,
 पाच किमी १८ ते ६५ वयोगटात महादेव पुंडलिक पाटील (मौजे कार्वे), कार्तिक रुपनर, सौरभ शामराव शिंदे (बेळगाव), वैशाली मनोज जांभळे (पारगड) अंजना सतीश बागेवाडी (बेळगाव), डॉ. सुजाता मनोज गावकर (गोवा) विजेते ठरले. 
        सर्व विजेत्यांना आमदार राजेश पाटील, बिपिन चिरमुरे, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल व वनरक्षक यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. सहभागी सर्व स्पर्धकांना टी-शर्ट, झाडाचे रोपटे, सहभाग प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मानित करण्यात आले. 
      स्पर्धेत ५ ते ८ वयोगटातील मुले, मुली तसेच ५० वर्षावरील पुरुष व महिला धावपटूंनी सहभाग घेऊन अतिशय खडतर स्पर्धा पूर्ण करून उपस्थितांची वाहवा मिळवली. सामाजिक वनीकरण विभागाने या उपक्रमासाठी पेरू, आवळा, काजू, फणस, आंबा, वड व पिंपळ  आदी ५०० रोपे दिली.
       कार्यक्रमाचे स्वागत गिर्यारोहक प्रवीण चिरमुरे यांनी केले, प्रास्ताविक पारगडचे माजी शिक्षक श्रीकांत पाटील यांनी केले. यावेळी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सरपंच संतोष पवार, सामाजिक वनीकरण चे वनपाल आर वाय पाटील, एन जी नागवेकर, रघुवीर शेलार, मारुती गावडे, भारत गावडे, 
       पी. जे. मोहनगेकर, प्रकाश चिरमुरे आदींसह स्टॉप इंडिया, फिट इंडिया, महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन, किल्ले पारगड जनकल्याण संस्था मुंबई, पारगड, मिरवेल, नामखोल ग्रुप ग्रामपंचायत, ऑल्टिट्यूड क्वेस्ट ॲडव्हेंचर, एल. एल. पी, आउट प्ले स्पोर्ट्स फाऊंडेशन आदी संस्था व संघटनांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, खेळाडू, मार्गदर्शक व क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन उत्तम पवार यांनी केले. विठ्ठल शिंदे यांनी आभार  मानले.

No comments:

Post a Comment