कुदनुरमध्ये दूचाकी मेस्त्रीची मुलगी नेहाने १० वीत मिळवले नेत्रदिपक यश, ग्रामस्थांनी केला सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

04 June 2023

कुदनुरमध्ये दूचाकी मेस्त्रीची मुलगी नेहाने १० वीत मिळवले नेत्रदिपक यश, ग्रामस्थांनी केला सत्कार

 

कु. नेहा जमादारचा सत्कार करताना विजय कोले, सोबत चंद्रकात कोकितकर व इतर

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

    १० वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहिर झाला अनं कुदनूर (ता चंदगड) येथे सर्वांन  नंदाची बातमी समजली. येथील दूचाकी दुरुस्ती करणारा मेस्त्री युसूफखान जमादार हिच्या कु नेहा ने १० वी बोर्ड परिक्षेत सर्व परिस्थितीवर मात करत ८९. २० % गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला.

 कु. नेहा येथील श्री सिध्देश्वर हायस्कूल मध्ये शिकत आहे. वडील दूचाकी व चारचाकी दूरुस्ती चा व्यवसाय करतात. मूलीने शिकावे यासाठी सतत धडपडत असतात. परिस्थिती बेताची असल्याने नेहाने सुद्धा कोणत्याही शिकवणी चा आधार घेतला नाही. घरची सर्व कामे करत व श्री सिध्देश्वर हायस्कूलमधे दिल्या जाणाऱ्या ज्ञानाचा उपयोग करून उज्वल असे यश संपादन केले. याचे यशाचे सर्व श्रेय आई वडीलांना सिध्देश्वर हायस्कूलच्या सर्व शिक्षकांना जाते असे नेहाने बोलताना सांगीतले. या उज्वल यशाबद्दल गावातील विजय कोले याने नेहाच शाल, श्रीफळ व वह्या देवून गौरव केला . यावेळी श्रीमती यल्लूबाई कोले, सौ. रेणूका कोले, मुमताज जमादार, कु. ज्योती मुर्डेकर, अमृता कोले व चंद्रकात कोकितकर आदि मान्यवर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment