चंदगडला राष्ट्रीयकृत बॅकेची शाखा सूरू करा, नगरसेवक दिलीप चंदगडकर यांची जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

07 July 2023

चंदगडला राष्ट्रीयकृत बॅकेची शाखा सूरू करा, नगरसेवक दिलीप चंदगडकर यांची जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी

 

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना नगरसेवक दिलीप चंदगडकर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा  

      चंदगड हे तालुक्याचे ठिकाण असून येथे तालुक्यातील नागरिकांसह परिसरातील २५ गावाचा दररोज संपर्कआहे. पतसंस्थां, सेवासंस्था, सेवानिवृत्त कामगारांची पेन्शन, टॅक्स भरणे, पीक कर्ज, इतर कर्ज, गृहकर्ज,  शासकीय पगार, नगरपंचायतीचे व्यवहार, काजु फॅक्टरीचे व्यवहार सध्या चंदगड मध्ये कार्यरत असलेल्या बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेमधून संथगतीने होत आहेत. याचा नागरिकांसह पेन्शनर लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे चंदगड शहरात दुसर्‍या राष्ट्रीयकृत बँकेची शाखा मंंजुर करावी अशी मागणी नगरसेवक दिलीप चंदगडकर यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

       चंदगड येथे जवळपास पन्नास वर्षापासून बॅंक ऑफ इंडिया ही एकच राष्ट्रीयकृत बँक असल्यामुळे या शाखेत मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यातंच शेतकरी वर्गाची संख्या लक्षणीय असून अपूरा कर्मचारी व ग्राहकांची गर्दी यामुळे वादावादीचे प्रसंग घडत आहेत. याशिवाय या शाखेत येणारे कर्मचारी हे बिगर मराठी असल्याने चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांची भाषा कळत नसल्याने अनेक वेळा वादावादीचे प्रसंग घडत आहेत. चंदगड शहरातील परिसरातील लोकसंख्येचा विचार करता चंदगड शहरांमध्ये अजून एक राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेची गरज असून ती  मंजूर करावी अशी मागणी  नगरसेवक दिलीप चंदगडकर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment