मुगळी प्राथमिक शाळेतील गैरवर्तणूक करणाऱ्या शिक्षकाची त्वरीत बदली करा, पालकांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

07 July 2023

मुगळी प्राथमिक शाळेतील गैरवर्तणूक करणाऱ्या शिक्षकाची त्वरीत बदली करा, पालकांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

 

निवेदन देताना पालक

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

        मुगळी (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक चंद्रकांत चिंगरे यांच्या गैरवर्तणुकीमुळे पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून सदर शिक्षकाची तात्काळ बदली करावी अशी  तक्रार पालकांनी गुरुवारी चंदगड गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

     शैक्षणिक दर्जाबाबत  समस्त गावातील पालक ५ जुलै रोजी शाळेत भेटणेसाठी गेले असता पालकांशी उध्दट उत्तर देणे, पालक बोलत असताना पालकांचे बोलणे न कळत मोबाईल रेकॉर्ड करुन घेणे, मुलांना शिकविणेच्या बाबतीत चुकारपणा करणे, सतत मोबाईलवर बोलत बसणे, शिकवण्याऐवजी गावच्या स्थानिक राजकारणात लक्ष केंद्रीत करणे आदी प्रकार या शिक्षकाकडून होत आहेत. त्यामुळे मुलांच्या शैक्षणिक बूध्दीमत्तेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने या शिक्षकाच्या गैरवर्तनाची योग्य दखल घेवून त्याची ताबडतोब बदली करावी, अशी मागणी समस्त पालकांकडून निवेदनातून मागणी केली आहे. तातोबा पाटील, पुंडलिक रेडेकर, गुंडू चव्हाण, गौरोजी निचम, नामदेव रेडेकर, संजय पाटील, दीनानाथ मळेकर, धाकू नुलकर आदीच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आदींना पाठविण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment