विनापरवाना जनावरांची वाहतूक करताना हुबळीचे दोघेजण चंदगड पोलिसांच्या ताब्यात - चंदगड लाईव्ह न्युज

05 July 2023

विनापरवाना जनावरांची वाहतूक करताना हुबळीचे दोघेजण चंदगड पोलिसांच्या ताब्यात


चंदगड / प्रतिनिधी
    विनापरवाना जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनासह पोलिसांनी सुपे तपासणी नाक्याजवळ साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
    मंजूनाथ महादेव दोडमणी (वय २५रा.हुबळी कर्नाटक) व अर्जुन हणमंतअप्पा गड्डदवर (वय २६ रा. हुबळी कर्नाटक) यांच्या विरोधात चंदगड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.रविवारी मंजूनाथ व अर्जुन हे दोघेही नंबर प्लेट नसलेल्या चारचाकी वाहनातून जनावरांची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. या वाहनाविषयी अधिक माहिती समजताच हिंदूत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते महांतेश देसाई, साईनाथ पाटील यांच्यासह १० ते १२ कार्यकर्त्यांनी पाठलाग करून सुपे तपासणी नाक्याजवळ त्यांना अडवले. गाडीत म्हैस, गाय, वळू व दोन वासरे असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लागलीच ही माहिती पोलिसांनी कळवली. त्यानंतर पोलिसांनी पाच जनावरे व वाहन असा एकूण साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.



No comments:

Post a Comment