चंदगड तालुक्यात पावसाची संततधार सुरुच, झांबरे प्रकल्प ओव्हरफ्लो, पाच बंधारे पाण्याखाली - चंदगड लाईव्ह न्युज

19 July 2023

चंदगड तालुक्यात पावसाची संततधार सुरुच, झांबरे प्रकल्प ओव्हरफ्लो, पाच बंधारे पाण्याखाली

मुसळधार पावसाने ताम्रपर्णी नदीवरील झांबरे धरण ओव्हरफ्लो झाले

नंदकुमार ढेरे, चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्यां मुसळधार पावसामुळे घटप्रभा नदीवरील पिळणी, भोगोली, कानडी, सावर्डे, अडकुर हे पाच बंधारे पाणीखाली गेले आहेत. आज रात्रभर पावसाने झोडपल्यास पुरस्थिती निर्माण होणार आहे. त्यातच जांबरे परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आज सायंकळी झांबरे प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे जांबरे प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने पुराचा धोका निर्माण होणार आहे.त्यामुळे नदीकाठावरील ग्रामस्थानी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दिवसभरात कोणतेही नुकसान झाल्याची माहीती अपत्ती व्यवस्थापनाकडे उपलब्ध नाही.

घटप्रभा नदीवरील हिडगांव पुलावर पाणी आल्याने चंदगड-इब्राहिमपूर-आजरा रस्त्यावरील वाहतूक बंद 
        तहसिल कार्यालयातील आपत्ती विभागातून मिळालेल्या माहीतीनुसार आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात  तालुक्यात सरासरी ७३.५ (३७३.५) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडल निहाय आजचा पाऊस व कंसात एकूण पासून – चंदगड ७५.५ (६४२), नागनवाडी ६० (२६६.७), माणगाव ६६.३(३०४.७), कोवाड ६६.५ (१८७.५), तुर्केवाडी ९५ (३६४.९), हेरे ७६.८ (४७३). आज सकाळपर्यंत हेरे सर्कलमध्ये सर्वांधिक ७६.८ मि. मि. तर सर्वांत कमी कोवाड सर्कलमध्ये ६० मि. मी झाला आहे. 

मुसळधार पावसामुळे ताम्रपर्णी नदीवरील कोनेवाडी बंधारा पाण्याखाली गेला आहे.

चंदगड तालुक्यातील प्रकल्पातील पाणीसाठी प्रकल्पाचे नाव व कंसात टक्केवारी  - तालुक्यातील सर्व प्रकल्पाची एकूण टक्केवारी सरासरीमध्ये – ५४.५८


मध्यम प्रकल्प - घटप्रभा (१००%), जांबरे (१००%) व जंगमहट्टी (३५%) 

No comments:

Post a Comment