चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात २९ एप्रिल २०२३ रोजी आयसीआयसीआय बँकेच्या वतीने रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन करण्यात आले होते.
सर्व शाखेतील पदवीधर विद्यार्थी तसेच बारावीच्या परीक्षेत ५० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले विद्यार्थी या नियुक्तीस पात्र होते. या कॅम्पस इंटरव्यूला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. या मुलाखतीतून १७ विद्यार्थ्यांची रिलेशनशिप मॅनेजर या पदावर निवड करण्यात आली. त्यांना वार्षिक २ लाख ७० हजार ते ३ लाख २५ हजार इतके वेतन मिळणार आहे. १९ ते २५ वयोगटातीलया उमेदवारांना भविष्यातही चांगल्या करिअरची संधी आहे. महाविद्यालयाच्या या उपक्रमाबद्दल परिसरातून प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील व करिअर गायडन्स व प्लेसमेंट सेलचे प्रमुख डॉ. आर. एन. साळुंखे यांचे कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment