कोदाळी ग्रामपंचायतीच्या वतीने १५ व्या वित्त आयोगातून अंगणवाडी व शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

25 July 2023

कोदाळी ग्रामपंचायतीच्या वतीने १५ व्या वित्त आयोगातून अंगणवाडी व शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप

शैक्षणिक साहित्यासह मान्यवर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       ग्रुप ग्रामपंचायत कोदाळी (ता. चंदगड) यांच्या वतीने १५ व्या वित्त आयोगातून नगरगाव, बांदराई, तिलारीनगार, गुळंब व कोदाळी शाळा तसेच अंगणवाड्यांना ब्लू टूथ स्पीकर, स्वयंपाकासाठी लागणारी भांडी रॅक, पिंप, कुकर, डबे, बादली यासह खुर्च्या, वॉटर फिल्टर अशा अत्यावश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. 

         याचबरोबर वित्त आयोगातून सरक्षक भिंत, छप्पर दुरुस्ती अशी कामे देखिल पंचायतीच्या वतीने केली आहेत. याकामी सरपंच सोनाली गावडे, अंकुश गावडे, यासह ग्रामपंचायत सदस्य यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन नगरगाव शाळेचे मुख्याध्यापक पुंडलिक गुरव यांनी केले. सचिन पिटूक यांनी आभार मानले. 

        कार्यक्रमाला ग्रां. प. सदस्य संतोष दळवी, सुनीता वाजंत्री, सुभाष गवस, राजू बुरुड, तनुजा यमेटकर, लक्ष्मी कांबळे, गीता घोडके, आरती दळवी, सविता डोईफोडे व सागरिका कुटे आदी गावकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment