सैनिकामुळेच भारत देश व भारतवाशी सुरक्षित - स. पो. नि. संदिप कांबळे - चंदगड लाईव्ह न्युज

26 July 2023

सैनिकामुळेच भारत देश व भारतवाशी सुरक्षित - स. पो. नि. संदिप कांबळे

 

कारगिल विजयी दिनानिमित्य नेसरी येथे कार्यक्रमात बोलताना सहाय्यक पो.लि.स. निरिक्षक संदिप कांबळे

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
          भारत देशाच्या संरक्षणाची सर्वात मोठी जबाबदारी सैनिक पार पाडत आहेत. पोलिस यंत्रणा अंतर्गत सुरक्षा सांभाळते. पण केवळ सैनिकांमुळेच आमच्यासह सर्व भारतिय सुरक्षित असून देश रक्षणासाठी सैनिकांचे योगदान खूपच महत्वाचे असल्याचे विचार नेसरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संदिप कांबळे यांनी व्यक्त केले. 
         नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे कारगिल दिनानिमित्य आजी माजी सैनिक संघटना नेसरी पंचक्रोशी यांच्यावतीने कारगील दिन साजरा करून हुतात्म्या ना आदरांजली वाहिली. यावेळी सपोनि संदिप कांबळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेसरीच्या सरपंच गिरीजादेवी शिंदे होत्या. सर्वप्रथम  शहिद जवान कॅ. दिपक शिंदे व सर सेनापती प्रतापराव गुजर यांच्या प्रतिमेला सपोनि श्री. कांबळे व सैनिक संघटनेचे अध्यक्ष वसंत गवेकर यांनी पुष्पहार अर्पण केले. यावळी सर्व जवांनानी भारत माता की जय म्हणत परिसर दणाणून सोडला.
          स.पो.नि.  श्री कांबळे पुढे बोलताना म्हणाले, ``देशावरील आलेली सर्व संकटे सैनिक परतावून लावतात. त्यांचा पराक्रम सुवर्णाक्षरानी लिहीला तरी तो कमीच पडेल. पोलीस अंतर्गत गुन्हेगारीवर वचक ठेवतात तर सैनिक सर्वच ठिकाणी प्राणपणाने लढतात. असे सैनिक भारत देशाची आण, बाण आणि शान असून निवृत्त झालेल्या सर्व सैनिकांना पोलिस स्टेशन कडून सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन सपोनि संदिप कांबळे यांनी दिले. 
        या कार्यक्रमाला वसंत गवेकर, शशिकांत जाधव, मोहन देसाई, मारुती रेडेकर, संभाजी देसाई, शंकर इंगळे, सागर रेडेकर, मारूती नावलगी आदि माजी सैनिक, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment