चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान 3 हे भारताची अंतराळ मोहीम यशस्वी झाली यामध्ये देशातील अनेक व्यक्ती आणि उद्योगांचा सहभाग आहे. या मोहिमेत चंदगड तालुक्यातील रामपूर गावच्या युवकाने प्रोपल्शनमध्ये लागणारे क्रँक स्पॉट हा महत्त्वाचा भाग पुरवत आपले योगदान दिले आहे. त्याने देशातील या मोहिमेत खारीचा वाटा उचललाय ही संपूर्ण चंदगड तालुक्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे.
चंदगड तालुक्यातील रामपूर येथील चंद्रकांत धाकलू ढेरे हा युवक सातारा येथील कपूर इंडस्ट्रीमध्ये नोकरी करतो त्याच्याकडून चांद्रयान 3 या मोहिमेत हा खारीचा वाटा उचलण्यात आला. चांद्रयान 3 या अंतराळ मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोने बनवलेल्या कॉम्पलेक्स या प्रणालीने महत्त्वाची भूमिका बजावली. प्रोपल्शन कॉम्प्लेक्स ने एक द्रव प्रणोदन प्रणालीत अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. ज्यामध्ये शुद्ध हायड्रोजन गॅसची आवश्यकता असते. या हायड्रोजन गॅसचा पुरवठा आंध्र प्रदेश मधील एका कंपनीने केला. पुरवठा केलेल्या हायड्रोजन गॅसच्या उत्पादनासाठी तीन कटिंग एज स्टॅंण्डर्ड हार्य कॉप्रेशर मशीन हे पुण्यातील बर्कहार्ट कॉम्प्रेशन या कंपनीने दिले. या प्रेशर कॉम्प्रेसन मशीन मध्ये लागणाऱ्या क्रँक शाफ्ट हा महत्त्वाचा भाग साता-यातीला कपूर कॉम्प्रेशनने पुरवला आहे. चंद्रकांत ढेरे यांनी हा क्रँक शाफ्ट बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली. देशाच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेत त्यांनी दिलेले योगदान निश्चितच चंदगड वाशीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
No comments:
Post a Comment