कोवाड महाविद्यालयात नवे शैक्षणिक धोरण याविषयी मार्गदर्शन व नवागतांचे विद्यार्थ्यांचे स्वागत - चंदगड लाईव्ह न्युज

15 August 2023

कोवाड महाविद्यालयात नवे शैक्षणिक धोरण याविषयी मार्गदर्शन व नवागतांचे विद्यार्थ्यांचे स्वागत

  


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

      कोवाड (ता. चंदगड) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आणि नवे शैक्षणिक धोरणावर मार्गदर्शन असा संयुक्त कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी संस्था सचिव एम. व्ही. पाटील होते. 

नेसरी येथील टी. के..कोलेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. भांबर यांनी एन. इ. पी. अर्थात् नवे शैक्षणिक धोरण या विषयी मार्गदर्शन केले. त्यांनी संस्था, महाविद्यालय, विधार्थी तसेच शिक्षक आणि सेवक आदि घटकांची माहिती या नव्या शैक्षणिक् धोरण बाबत चर्चा करून आपल्याला या धोरणानुसार नवीन वर्षात काम करायचे आहे. यासाठी सर्व बाबी अभ्यासने गरजेचे असल्याचे सांगितले. 

      प्रारंभी मान्यवरांचे हस्ते छ. शिवाजी राज्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. एम. एस. पवार यांनी प्रास्ताविक करून महाविद्यालयाच्या वाटचालीचा आढावा घेतला. डॉ. व्ही. आर. पाटील यांनी विविध उपक्रमाची माहीती दिली. विध्यार्थ्यांना शासनाकडून तसेंच विविध माध्यमातून मिळणाऱ्या स्कॉलरशिप बाबतची सविस्तर माहिती डॉ. के. पी. वाघमारे यांनी दिली. यावेळी प्राचार्य डॉ.भांबर यांचा संस्थेच्या वतीने सचिव एम. व्ही. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एम. व्ही. पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

      महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या कला, वाणिज्य व विज्ञान आणि बी. सी. ए. च्या नवागत विधार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी संचालक एम. जे. पाटील यासह सर्व विद्याशाखांचे प्राध्यापक, सर्व प्रसासकीय सेवक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आय क्यू ए सी विभागामार्फत करण्यात आले होते. सूत्रसंचालन डॉ. मोहन घोळसे यांनी केले तर आभार डॉ. आर. डी. कांबळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment