चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड पंचायत समिती येथे स्वातंत्र्य दिनांचा ७६ वा वर्धापन दिन उत्साहत साजरा करणेत आला.
चंदगड पंचायत समिती चंदगड येथे रविवार दिनांक १३ ऑगस्ट २०२३ रोजी श्रीमती लक्ष्मी रामचंद्र पुजारी विधवा पत्नी यांच्या हस्ते ध्वजारोहन करणेत आले. सोमवार दिनांक १४ ऑगस्ट २०२३ रोजी श्रीमती शर्मिला राजेंद्र तुपारे शहीद वीर पत्नी यांचे हस्ते ध्वजारोहन करणेत करणेत आले. यावेळी शहीद वीर पत्नी यांचा सत्कार गट विकास अधिकारी सुभाष लक्ष्मण सावंत यांच्या हस्ते करणेत आला. मंगळवार दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी गट विकास अधिकारी सुभाष लक्ष्मण सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहन करणेत आले. यावेळी पंचायतम समितीचे माजी सभापती शांताराम पाटील उपस्थित होते. वरील सर्व कार्यक्रमाच्या वेळी कन्या विद्या मंदिर व मराठा विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर केले. यावेळी पंचायत समिती कडील सर्व खाते प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच `मेरी मिट्टी मेरा देश` अभियान चंदगड तालुक्यात दिनांक १४ ऑगस्ट ते दिनांक २० ऑगस्ट २०२३ अखेर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या उत्साहात साजरे करणेत येत आहे.
No comments:
Post a Comment