स्वातंत्र्य दिनानिमित भव्य तिरंगा यात्रा ! शिवाजीराव पाटील यांचा बाईकवरुन सहभाग - चंदगड लाईव्ह न्युज

15 August 2023

स्वातंत्र्य दिनानिमित भव्य तिरंगा यात्रा ! शिवाजीराव पाटील यांचा बाईकवरुन सहभाग

बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले युवक.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     चंदगड विधानसभा मतदारसंघातील युवकांच्या उपस्थितीत मतदारसंघाचे जेष्ठ नेते व माजी मंत्री भरमूअण्णा पाटील यांच्या हस्ते इनाम सावर्डे येथून तिरंगा यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. या रॅलीमध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघाचे निवडणुक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी स्वतः बाईक चालवत रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या बाईकवर माजी मंत्री भरमूअण्णा पाटील हे पाठीमागे बसले होते. सर्व परिसर उत्साहाने प्रफुल्लित झाला होता. "भारत माता की जय ...! वंदे मातरम " घोषणेने अंगामध्ये एक प्रकारची वीरश्रीच संचारली होती. हलकर्णी फाटा अजिंक्यतारा हॉल येथे भव्य बाईक रॅलीची सांगता करण्यात आली.

         यावेळी तालुका अध्यक्ष नामदेव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अंकुश गवस, चंदगड अर्बन बँकेचे संचालक श्री. सातवणेकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र बांदिवडेकर, श्री. शिवणगेकर, मार्केट कमिटी सदस्य भावकू गुरव, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment