हेरे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेल्या ग्रामसभेत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा ऐतिहासिक निर्णय...... - चंदगड लाईव्ह न्युज

15 August 2023

हेरे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेल्या ग्रामसभेत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा ऐतिहासिक निर्णय......

ग्रामसभेच्या प्रसंगी नवागत मुलीच्या नावे ठेवीची घोषणा करताना ग्रामपंचायत कमिटी व मान्यवर

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         हेरे (ता. चंदगड) येथे १५ ऑगस्ट २०२३ रोजी झालेली स्वातंत्र्य दिन ग्रामसभा ऐतिहासिक ठरली. गावातील कोणत्याही कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यास तिच्या नावे रोख रुपये २१००/- इतकी रक्कम पोस्टातील सुकन्या योजनेत ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय या सभेत घेण्यात आला. ही रक्कम सरपंच, उपसरपंच व सदस्य स्वखर्चातून ठेवणार आहेत. रक्कम छोटी असली तरी यामागील सरपंच व सदस्यांची भावना उदात्त असल्याचे दिसून येते. या निर्णयामुळे गावातील मुलींचा जन्मदर वाढण्यास प्रोत्साहन मिळेल यात शंका नाही.

      ग्रामसभेला सरपंच सौ. जयश्री अप्पाजी गावडे, उपसरपंच विशाल बल्लाळ, सदस्य संतोष भिसे, सुरज झांबरेकर, मृणाल सावंत, तोफेरा आगा, संगीता चव्हाण, प्रमिला चंदगडकर, वेदिका वंजारे, पांडुरंग कांबळे, ग्रामसेवक संतोष खोजगे यांच्यासह तंटामुक्त कमिटी अध्यक्ष चंद्रकांत पाटकर, मुख्याध्यापक उत्तम पवार, माजी सरपंच शंकर चव्हाण, पंकज तेलंग, आप्पाजी गावडे आदींची उपस्थिती होती. हेरे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्यांचा हा उपक्रम तालुक्यातील इतर गावांना निश्चित दिशादर्शक ठरेल अशी चर्चा आहे.

No comments:

Post a Comment