'जय जवान जय किसान' चा नारा देत आदर्श शेतकऱ्याच्या हस्ते ध्वजारोहन, चंदगड येथील फादर अग्नेल स्कूलचा स्तुत्य उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

15 August 2023

'जय जवान जय किसान' चा नारा देत आदर्श शेतकऱ्याच्या हस्ते ध्वजारोहन, चंदगड येथील फादर अग्नेल स्कूलचा स्तुत्य उपक्रम

चंदगड येथील फादर एग्नेल स्कूल मध्ये स्वतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण करताना आदर्श शेतकरी निंगोजी कुंदेकर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      चंदगड येथील फादर अग्नेल स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाप्रसंगी शासनाच्या 'मेरी माटी मेरा देश' या उपक्रमाला अनुसरून फादर अग्नेल स्कूल चंदगड मध्ये सर्व शेतकरी पालकांना एकत्र घेऊन ध्वजारोहन कार्यक्रम करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून  नांदवडे येथील शासनाच्या उपक्रमात सहभागी झालेले व एकरी 35 क्विंटल नाचना पीक घेतलेले आदर्श पुरस्काराने सन्मानित असलेले  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते गौरव करण्यात आलेले नांदवडे येथील शेतकरी  निंगोजी कुदेकर लाभले होते. निंगोजी कुंदेकर या आदर्श शेतकऱ्याच्या हस्ते ध्वजारोहण करून एक समाजासमोर आदर्श ठेवण्यात आला. शेतकऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. शाळेच्या प्रांगणात शंभरहून अधिक शेतकरी पालक उपस्थित होते. सर्व शेतकरी बांधवांचा, पालकांचा शॉल देऊन सन्मान करण्यात आला. 

   या कार्यक्रम प्रसंगी बोलताना मुख्याध्यापक फादर विल्सन पॉल म्हणाले, ''भारत हा कृषिप्रधान देश असून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा विसर पडता कामा नये. दिवस रात्र काबाडकष्ट करणारा शेतकरी यांचा सन्मान करून त्यांच्याशी आपण जिव्हाळ्याचे संबंध ठेवले पाहिजेत. असे त्यांनी आपल्या मनोगतामधून शेतकऱ्यांप्रती भावना व्यक्त केल्या.''

 अध्यक्ष भाषणातून निंगोजी कुंदेकर यांनी आपल्या शेतकऱ्याची व्यथा कथा मांडली. अशा भव्य कार्यक्रमात ध्वजारोहण करण्याचा मान दिल्याबद्दल शाळेचे आभार मानले. यावेळी शालेय स्तरावर रांगोळी, वेशभूषा कार्यक्रमात भाग घेतलेल्या पालकांचा व स्पर्धेत क्रमांक मिळवलेल्या पालकांचा पारितोषिक वितरण करून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात पालकांनी उपस्थिती दर्शवली होती. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाणी म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यावेळी मॅनेजर फादर लॉन्जिनस, व्हॉइस प्रिन्सिपल फादर रिगन, फादर मायकल प्रकाश सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेयस गावडे व श्रेया गावडे यांनी केले. तर आभार वैष्णवी शिंदे यांनी मानले.No comments:

Post a Comment