जेलुगडे प्राथमिक शाळेत सक्षम संघटनेकडून शैक्षणिक साहित्य वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

16 August 2023

जेलुगडे प्राथमिक शाळेत सक्षम संघटनेकडून शैक्षणिक साहित्य वाटप

सक्षम संघटनेकडून शैक्षणिक साहित्य वाटप

चंदगड / प्रतिनिधी

      जेलुगडे (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.ध्वजारोहण ॲड. नामदेव नारायण गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सक्षम या संघटनेकडून प्राथमिक शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

          पहिली ते चौथीच्या मुलांना स्वेटर (जॅकेट) तर बालवाडीच्या मुलांना दप्तराचे वाटप  करण्यात आले. तसेच संघटनेकडून पहिली ते चौथीच्या वर्गात प्रथम, द्वितीय व तृतीय मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देण्यात आली. यावेळी सरपंच कृृृष्णा नाईक, एल आर गावडे (माजी सरपंच ) अंकुश प्रधान, सुधाकर बंदिवाडेकर, दत्ताराम गावडे, पांडुरंग गावडे, सुभाष नाईक, लक्ष्मण रुक्मणा गावडे, सुधाकर पांडुरंग बांदिवडेकर, अंकुश धोंडीबा प्रधान, नारायण दत्तू गावडे, जकोबा  धाकलू गावडे आदीसह उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment